शर्वरी राठोड चे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश
केज-
24/09/2023 रोजी उदगीर येथे झालेल्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत रामकृष्ण महाराज निवासी विद्यालय पिंपळगव्हाण या शाळेची विद्यार्थिनी कु.शर्वरी कृष्णा राठोड हिने ब्राॅंझ पदक मिळवून शाळेचे व संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्यात उज्वल केले.या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा.विक्रम बप्पा मुंडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
