केज तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटले
केज-कळंब रोडवर सुर्डी फाटा येथे रस्ता रोको,
चिंचोली माळी, बोरगाव (बु) काळेगाव (घाट), चंदन सावरगाव आणि येवता येथे उपोषण
गौतम बचुटे/केज :- मराठा आरक्षण तात्काळ
मिळावे आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी केज-कळंब रोडवर सुर्डी फाटा येथे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. तर चिंचोली माळी, बोरगाव, काळेगाव (घाट), चंदन सावरगाव येथे उपोषण सुरू असून येवता येथे आज रात्री पासून गावकरी उपोषणाला बसणार आहेत.
दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्यावर सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील पंधरा दिवसा पासून जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटे येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला. हे रस्ता रोको आंदोलन सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ सुरू असल्याने स्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती.
चिंचोली माळी येथे दि. १० सप्टेंबर पासून रोहन गलांडे आणि चंदन सावरगाव येथे दिगंबर तपसे हे यांनी गावात आमरण उपोषण सुरू आहे. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे तो पर्यंत उपोषण सुरू ठेवण्यावर रोहन गलांडे आणि दिगंबर तपसे हे दोघे ठाम आहेत.
तसेच बोरगाव येथे डिगांबर शेषेराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी हनुमान मंदिरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.या निवेदनावर अनेक तरूण युवक, ग्रामस्थांनी सह्या करून आपला पाठिंबा दिला आहे. त्याच बरोबर काळेगाव (घाट) येथे दोन दिवसीय उपोषण सुरू आहे. तर येवता येथे आज रात्री पासून गावकरी उपोषणाला बसणार आहेत.
—————————————————
रस्त्यावर टायर पेटविले :- आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन केले.
—————————————————–
लहान मुलासह महिलाही उतरल्या रस्स्यावर :- या आंदोनलात लहान मुलांना कडेवर घेऊन महिला देखील सहभागी झाल्या होत्या. एक आजारी माता व तिच्या नवजात बाळाला दवाखान्यात जाण्यासाठी आंदोलकांनी रस्ता रिकामा करून दिला.
