मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा
माजलगाव- प्रतिनिधी
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पुढारी मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी कायम विरोध करत आहेत. मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी रोखून धरले आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी या विरोधात आवाज उठविण्यासाठी माजलगाव मतदारसंघाचे भाजपा नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा पाटबंधारे महामंडळ कार्यालयच्या दारात ठिय्या धरला यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत हक्काच्या पाण्यासाठी एल्गार पुकारला. दरम्यान संबंधित पाण्यामुळे माजलगाव तालुक्यातील शेतकरी, व नागरिक यांचा मोठा पाणी प्रश्न मिटणार आहे.
