Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान , पिक विमा तात्काळ मंजूर करा युसुफवडगाव येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By September 5, 2023No Comments2 Mins Read

कोरडा दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान , पिक विमा तात्काळ मंजूर करा

युसुफवडगाव येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

केज –

युसुफ वडगाव ,बनसारोळा महसूल मंडळातील संतप्त शेतकऱ्यांचा अंबाजोगाई- कळंब मार्गावरील युसुफवडगाव येथे तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले .गेल्या 40 दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने खरीपातील सोयाबीन पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्हा कृषी विभागाने केज तालुक्यातील युसुफवडगाव, बनसारोळा,होळ,आडस, चिंचोलिमाळी ,नांदूर घाट, मस्साजोग,विडा ,हनुमंत पिंपरी,केज सह सर्वच महसूल मंडळे 25% अग्रिम पिक विमा नुकसान भरपाईतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.
तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान, 100% टक्के पिक विमा मंजूर करून 25 % अग्रीम नुकसान भरपाई तात्काळ द्या .आदि प्रमुख मागण्या घेऊन युसुफवडगाव, बनसारोळा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी अंबाजोगाई-कळंब राज्य मार्गावरील युसुफवडगाव येथे आज दि.4 सोमवारी सकाळी 9:30 वाजता तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले .रास्ता रोको आंदोलन लांबल्याने रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.योगेश उबाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी मंडळ अधिकारी श्री..
यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून शासनाकडे आपल्या मागण्या पाठवून शासन निर्देशानुसार प्रशासनाकडुन योग्य निर्णय घेण्याचे आश्वस्त केल्याने आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन थांबवले या रास्ता रोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी क्रांती मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष संभाजी ब्रिगेड, आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ,प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने आंदोलनात मोठी गर्दी झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, शेकाप चे भाई मोहन गुंड, सुग्रीव करपे,सतिश भाऊ शिंदे, रामदास नांदे ,राचलिंग पाटील ,गुरुप्रसाद थळकरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हनुमंत सौदागर,संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे,आदि पदाधिकारी ,शेतकरी ,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post Views: 43

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.