जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ केज मध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला


केज बंद : टायर पेटवून केले रस्ता रोको
गौतम बचुटे/केज :-
जालना जिल्ह्यात आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समजाच्या युवकांनी रस्त्यावर उतरून केज मध्ये बंद पाळण्यात आला तर, छत्रपती शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठी हल्ला केला. त्याचा निषेध सर्व जिल्ह्यात होत असल्याने केज मध्ये मराठा बांधवांनी निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्या नंतर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्या नंतर युवकांनी रस्त्यावर ठिय्या देऊन रस्ता रोको आंदोलन केले तर चौकात टायर पेटविले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली. दरम्यान आंदोलकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार आशा वाघ यांना दिले. आंदोलकांना सर्व पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात प्रा. हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, विनोद शिंदे, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, पंजाब देशमुख, धनंजय कुलकर्णी, देशमुख, विकास मिरगणे, शिवाजी ठोंबरे, हनुमंत घाडगे, भाऊसाहेब गुंड, अरुण गुंड, अमर पाटील, राहुल खोडसे, भारत बुदगुडे, सत्वधर यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.
———————————-रुग्णवाहिकेला दिला रस्ता रिकामा करून ! :- रस्ता रोको दरम्यान एक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन जात असताना आंदोलकांनी रस्त्यावर असलेले अडथळे हटवून रुग्णवाहिकेला रस्ता रिकामा करून दिला.
———————————-
साळेगांव येथेही बंद :- लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ केज तालुक्यातील साळेगांव येथेही सर्व व्यवहार बंद ठेवून अमानुष हल्ल्याचा निषेध केला.
