सारणी-सांगवीच्या वळणावर अपघात : मोटार सायकलस्वार जखमी
गौतम बचुटे/केज :- केज-मांजरसुंबा रोडवर सांगवी-सारणी जवळ रस्त्याच्या वळणावर एक इर्टीगा आणि मोटार सायकलीचा अपघात झाला. अपघातात मोटार सायकलस्वार जखमी झाला आहे.
दि. १० ऑगस्ट बुधवार रोजी ४:०० वा. च्या सुमारास केज-मांजरसुंबा या महामार्गावर सारणी सांगवीच्या पुला जवळ असलेल्या वळणावर एक इर्टीगा क्र. (एम एच-१४/एफ जी-२७८३२) आणि मोटार सायकल क्र. (एम एच-२५/ए ओ-१११४) चा अपघात झाला. अपघातात निलराज महादेव गुंजाळ ( रा. कळंब जि. उस्मानाबाद) याच्या पायाला गंभीर मार लागून ते जखमी झाले आहेत. जखमीला उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविले असल्याचे कळते.