पंधरा दिवसा पासून गाव अंधारात म्हणून सरपंच उपसरपंच चढले पाण्याच्या टाकीवर
आंदोलनाची दखल न घेतल्यास जिविताचे बरेवाईट करण्याची दिली धमकी
अद्याप पर्यंत कोणीही अधिकारी फिरकला नाही
गौतम बचुटे/बीड (केज) :- बीड जिल्ह्यातील सोनेसांगवी (सुर्डी) ता केज येथील सरपंच मुकुंद कणसे आणि ग्रामस्थ हे वीज वितरण कार्यालयाने गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा ता मागणीसाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. मात्र आंदोलनास्थळी कोणीही अधिकारी फिरकलेला नाही. १:०० वा.जे पर्यंत जर कोणी दखल घेतली नाही तर पुढचे पाऊल उचलू अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. या आंदोलनात सरपंच मुकुंद कणसे, उपसरपंच राहुल डिकले यांच्यासह तिराम वाघमारे, एजाज शेख, सूरेश गालफाडे हे पाच युवक सहभागी झालेले आहेत.
