केज येथे माजी सैनिकांच्या वतीने मणिपूर घटनेचा तीव्र निषेध…!
केज: मणिपूर येथे महिलांवर लगातार होत असलेला अत्याचार व हिंसेबाबत केंद्र शासनाने दोषी विरोधात कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी केज येथे संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या व नागरिकांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे महिलांवर प्रचंड अत्याचार सुरू आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच घडलेल्या एका घटनेत कारगिल युद्धात ज्या माजी सैनिकांने महत्वाची सेवा पार पाडली त्याच्या पत्नीवर देखील अत्याचार करण्यात आले. राज्यशासन व केंद्र शासनाने या विरोधात कठोर पावले उचलून दोषींवर कार्यवाही करावी या मागणीसाठी सोमवारी येथील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय रॅली काढून केज च्या केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजिमोद्दीन शेख, सचिव हनुमंत भोसले, उपाध्यक्ष राम राऊत, राजेंद्र बारगजे, ऑन कॅप्टन अनिल सपाटे, मस्के, नवनाथ बारगजे, घोडके, शेख इलाही, विडेकर, वाळके, हनुमंत घाडगे सर, सविता आकुसकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
