मोटारसायकल व चारचाकी गाडीच्या धडकेत एक जण मयत तर दुसरा गंभीर जखमी
केज धारूर रोडवरील घटना
केज-
केज धारूर रोडवर सानेगुरुजी शाळेजवळ एक चारचाकी एम एच १० बीजी ७००७ व दुचाकी एम एच ४४आर ९०७५ या दोन वाहनांची जोराची धडक आज दि. १५ रोजी दुपारच्या सुमारास झाली आहे. यात मोटारसायकल वर असणारे रामेश्वर सदाशिव घुले रा. टाकळी हे मयत झाले आहेत तर खंडू चोले हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्थांना केज ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले होते परंतू एका मोटारसायकलवर असणार्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
