सहा चारचाकी गाड्यांचा केज येथे विचित्र अपघात
केज-

आज दुपारी ४:३० च्या सुमारास शहरातील मुख्य महामार्गावर अनिल भोजनलया समोरच मोठ्या टँकर ने वळण घेत असलेल्या पिकप ला जोराची धडक दिली. यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या इतरत्र गाड्या या धडकेने दूर ढकलल्या गेल्या त्यामुळे पिकप टँकर यांच्या धडकेत तिथे उभे असणारे ॲम्बुलन्स स्कार्पिओ एक कार व दुचाकी त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
हा अपघात पाहताना नेमका प्रकार कसा घडला ते समजू शकले नाही. तेथे उपस्थित नागरिक यांच्या म्हणण्यानुसार बीडच्या दिशेकडून टँकर येत असताना पिकप अनिल भोजनलयासमोरून समोरील वळणावरून वळत असताना टँकर वरती चर्चा अपघात झाला यामध्ये बाकीच्या वाहनाचेही नुकसान झाले या अपघातात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही मात्र या अपघातानंतर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
