केज मांजरसुंबा रोडवर सारणी (सांगवी) येथे
टिप्परची मोटार सायकला धडक ! 
अपघातात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी !
गौतम बचुटे/केज :-
नातेवाईकांच्या मुलींसाठी मुलगा पहायला केजकडे मोटार सायकलावरून जात असलेल्या एका सहशिक्षक आणि त्यांच्या पत्नीला केज-मांजरसुंबा रोडव सारणी (सांगवी) पाटीवर एका इको सँडची वाहतूक करणाऱ्याका टिप्परने जोरदार धडक दिली. यात मोटार सायकल चालवीत असलेल्या सहशिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील खाडेवाडी ता. केज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक असलेले भागवत महादेव तांदळे वय ४५ वर्षे आणि त्यांची पत्नी सौ. महानंदा भागवत तांदळे वय ४८ वर्ष रा. आंबील वडगाव ता. केज हे नातेवाईकांच्या मुलीला स्थळ पाहण्यासाठी दि. १ जून रोजी सकाळी ११:३० वा. मोटार सायकल क्र. (एम एच-२३/ए झेड ०८३७) वरून केज-मांजरसुंबा रोडने जात असताना दुपारी ११.०० वा. च्या सुमारास सारणी (सांगवी) ता. केज पाटीजवळ इको सँड ची घेऊन जात असलेल्या भरधाव टिप्पर क्र. (एम एच ०४/जी सी ८०३६) ने त्यांना जोरदार धडक दिली. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक असलेले भागवत महादेव तांदळे वय ४५ वर्ष रा. अंबिलवडगाव ता. जि. बीड यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी महानंदा तांदळे वय ३८ वर्ष या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, शमीम पाशा आणि संभुदेव दराडे हे घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला असून जखमी महिलेला उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.
