भारतीय किसान संघाच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्या करीता केज तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन
केज–
केज तालुक्यात दिनांक 08/04/2023 रोजी बोरगाव (बु.)भोपला, वरपगाव व परिसरात प्रचंड मोठी गारपिट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मोठे अधिक नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे म्हणून भारतीय किसान संघ यांच्या वतीने तहसिल कार्यालया समोर अनेक शेतकरी प्रमुख मागण्या घेऊन धरणे अंदोलन करत आहे . यावेळी शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्यापैकी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 1.50,000/- एक लाख पन्नास हजार रुपये अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी नियमीत कर्जफेड करतात त्यांना 50,000/- पंन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहिर केले होते परंतू त्यातील बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत तसेच याच योजनेत ज्या शेतकर्याकडे 2,00,000/- दोन लाख कर्ज आहे.
यातील काही शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली परंतू काही शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यांचे प्रमाणीकरण ही झाले नाही. याबरोबरच
सतत पडणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टी, पुर, चक्रीवादळ याचे शासनाने जाहिर केलेले नुकसान भरपाई पोटी प्रती हे. आर 13,600/- तेरा हजार साहशे अनुदान अद्याप वाटप केलेले नाही. तसेच 08/04/2023 रोजी झालेल्या गारपिठीचे पंचनामे करुन तात्काळ मदत मिळावी. व सन 2022 2023 चा खरीप पिकविमा केवळ 25% वाटप करण्यात आला आहे. परंतु अद्यापही पिकविमा वाटप करणे बाकी आहे. तसेच वन्यप्राणी उ. डुकरे, हरीण तालुक्यात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करतात वन्य प्राण्याचा वन खात्याकडुन बंदोबस्तही होत नाही आणि नुकसान भरपाईही मिळत नाही. तसेच PM किसान सन्माननिधी पासुन अनेक पात्र शेतकरी वंचित आहेत यासह विविध मागण्या घेऊन भारतीय किसान संघाचे तालुका अध्यक्ष कमलाकर वळेकर,उपाध्यक्ष धनंजय गव्हाणे , अशोक विठठल निंगुळे, अमरणाथ विजय बोटाडे , शंशिकांत लक्ष्मणराव गव्हाणे , दिनेश शिंदे , दत्तात्रय आरकडे , लक्ष्मण वळेकर , विशाल वळेकर , दत्तात्रय शिंदे , शहाजी फाटक , औंदबुर शिंदे , रामकृष्ण गव्हाणे , शहाजी गव्हाणे , योगीराज गव्हाणे , समाधान गाते , विश्वनाथ गव्हाणे , महादेव वीर , कालिदास आरकडे , भैय्यासाहेब आरकडे, रघुनाथ वळेकर , शरद केदार, एकनाथ काळे , धनंजय गव्हाणे , अशोक चाटे , अमोर चिगुरे , ऍड. अक्षय शिंदे , बालासाहेब गव्हाणे , कालिदास फाटक , अशोक फाटक , संतोष बोराडे ,अशोक वर्लेकर , समय गव्हाणे , भागवत शिंदे , देविदास गायकवाड यासह असंख्य शेतकरी धरणे आंदोलनास बसले आहेत.
