तीन दिवसां पासून गावात लाईट नसल्यामुळें संतप्त महिलांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील तांबवा येथे मागील तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे महिलांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून आक्रोश केला.
केज तालुक्यातील तांबवा येथे मागील तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांना पाणी, दळण मिळत नाही. तसेच जनावरांना पाणी मिळत नसल्याने संतप्त महिला आणि नागरिकांनी दि. १५ एप्रिल रोजी संतप्त महिलांनी उपअभियंता अंडील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले. यावेळी महिलांनी पाण्याचे रिकामे हंडे आपटून प्रचंड रोष व्यक्त केला.
या वेळी रामधन चाटे, अरुण चाटे, विनोद चाटे, ज्ञानेश्वर कराड, गोविंद नागरगोजे, बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव वायबसे, दत्ता चाटे, शिवकुमार कराड, सचिन चाटे, राहुल कराड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसी जमादार त्रिंबक सोपणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
