Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
क्रिडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमिलीयर क्रिकेट लीग (APL) स्पर्धेत पोलीस फ्रेंड्स क्लब विजयी

By March 22, 2023Updated:March 22, 2023No Comments2 Mins Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमिलीयर क्रिकेट लीग (APL) स्पर्धेत पोलीस फ्रेंड्स क्लब विजयी

/केज :- केज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेचे जेतेपद केज पोलीस फ्रेंड्स क्रिकेट क्लबने पटकाविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त युवा सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे यांनी केज शहरात पंचायत समिती मैदान केज येथे आंबेडकर प्रीमिअर लिगचे आयोजन करण्यात होते. दि. २१ मार्च रोजी पोलीस फ्रेंड्स क्रिकेट क्लब केज व त्रिमूर्ती क्रिकेट क्लब केज या दोन संघात अंतिम सामना खेळवण्यात आला. त्यामध्ये पोलीस फ्रेंड्स क्रिकेट क्लब केज संघाने त्रिमूर्ती क्रिकेट क्लब केज या संघाचा पराभव करून ५१००० रू. प्रथम पारितोषिक पटकावले.
या संघाचे पाँन्सर मतीन शेख हे होते. विजयी संघाचे कॅप्टन सुनील माने आणि अशोक गवळी, हनुमंत गायकवाड, संतोष गित्ते, शमीम शेख, संकेत चाटे, पवन चाटे, अमजद शेख, संग्राम पाटील, अविनाश शिंदे, बाळू सिरसट,अक्षय जगताप, दत्ता ढाकणे हे खेळाडू सहभागी झाले होते.
या विजया बद्दल पोलीस फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक कादरी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेच्या अंतिम सामना पाहण्यासाठी सन्माननीय बाबुरावजी पोटभरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेते, उपविजेता संघास जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारूणभाई, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, माजी जि.प.सदस्य कदम, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, बाळासाहेब गाढवे,   अकबरभाई इनामदार,गणेश खराडे, सागर डिकुळे, डॉ. विजय मोराळे, शद्दुभाई खतीब,   मिनाज पठाण सर कलिम शेख तसेच क्रिडा प्रेमी, खेळाडू, पत्रकार यांच्या उपस्थित बक्षीस वितरण करण्यात आले.

Post Views: 141

Related Posts

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

December 1, 2025

येडेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना मा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण

February 25, 2024

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

February 3, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 4 0
Total Users : 149340
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.