Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

वीज वितरण कार्यालया समोर शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न ! सुरक्षा रक्षकाच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला

By January 17, 2023No Comments2 Mins Read

वीज वितरण कार्यालया समोर शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न !

सुरक्षा रक्षकाच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला

गौतम बचचुटे/केज :- केज तालुक्यातील शेतकऱ्याला शेतातील वीज पंपाच्या विद्युत जोडणीसाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्याच्या कथित मागणीमुळे शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्या ठिकाणी कर्तव्यावर हजर असलेले सुरक्षा रक्षक यांच्या दक्षतेमुळे पुढील अनर्थ टळला.

या बाबतची माहिती अशी की, मंगळवार दि. १७ मंगळवार जानेवारी रोजी धनराज सदाशिव घुले वय ३५ रा. टाकळी याने दुपारी १:०० केज येथील उपअभियंता वीज वितरण कार्यालया समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगावर पेट्रोल वरून घेऊन खिशातील आगपेटी काढून पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्या ठिकानी कर्तव्यावर हजर असलेले सुरक्षा रक्षक फुलचंद डापकर यांनी त्या शेतकऱ्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत अटकाव केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याने सांगितले की, धनराज घुले याने मागील दोन वर्षा पूर्वी त्याने आणि त्याच्या शेजारील दोन शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्याला वीज जोडणी दिलेली नाही. त्यामुळे त्याचे पिकाचे नुकसान होऊन प्रचंड नुकसान झालेले आहे. या बाबत त्याने वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्याला गुत्तेदाराकडे पाठविण्यात आले. गुत्तेदाराने त्याला ३५ हजार रु. ची मागणी केली. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
दरम्यान या शेतकरी आत्मदहन करीत असल्याची माहिती प्राप्त होताच केज पोलीस ठाण्याचे श्रीकांत चौधरी, उमेश आघाव, शेख मतीन, दिलीप गित्ते, आवेज शेख, नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन धनराज घुले याला ताब्यात घेतले.

कोट :-

” सदर शेतकऱ्याला कोणीही अनाधिकृतरीत्या पैशाची मागणी केली नाही. तसेच १.३ योजनेत शेतकऱ्याने स्वखर्चाने गुत्तेदारांच्या मदतीने काम करून घेण्यासाठी रितसर पैसे लागतात असे त्याला गुत्तेदारानी सागितले असावे. तसेच सदर शेतकऱ्यास ए सी एफ मधून वीज जोडणी देण्यात येणार आहे परंतु त्याच्या अगोदर दोन शेतकरी आहेत.”
—- मुंडे, सहाय्यक उपअभियंता
वीज वितरण कंपनी
————————————————–

” गावातल्या स्थानिक राजकारणामुळे माझे वीज पुरवठ्याचे काम अडविले असल्याचीही शक्यता आहे.”
— धनराज घुले, शेतकरी

Post Views: 38

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.