झारखंड सरकारच्या निषेधार्थ जैन बांधवांनी व्यवसाय बंद ठेवून केला निषेध व्यक्त
केज :-
झारखंड सरकारने जैन धर्मियांचे पवित्र स्थळ सिध्दक्षेत्र महापर्वतराज श्री. सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. त्याचा केज मधील जैन धर्मीय बांधवांनी निषेध केला असून त्या निमित्त सर्व जैन बांधवांनी आपापले सर्व व्यवहार बंद ठेवले.
या बाबतची माहिती अशी की, जैन धर्मियांचे झारखंड राज्यातील पवित्र क्षेत्र श्रीसम्मेद शिखरजी (गिरडीह) येथून जैन धर्मियांचे २४ पैकी २० तिर्थकर मोक्षास गेले आहे. हे स्थळ जैन धर्मियांची श्रध्दास्थान आहे. मोगल, बौद्ध, इंग्रज राजवटीने या तिर्थक्षेत्रास संरक्षण दिले व क्षेत्राचे पावित्र्य अबाधित ठेवले. परंतु झारखंड सरकारने श्रध्दास्थान असलेल्या या ठिकाणाला पर्यटन स्थळ घोषीत केले आहे. त्यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पर्यटन स्थळ जाहिर झाल्यामुळे तेथे डान्सबार, कॅसिनो, मांसाहारी हॉटेल्स या व्यावसायास चालना मिळेल. त्यामुळे अहिंसा तत्वाला बाधा येवुन क्षेत्राचे पावित्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणुन सर्व जैन धर्मियाचा त्याला विरोध आहे . श्रीसम्मेद शिखरजी ( झारखंड ) पवित्र तिर्थक्षेत्र जाहिर करावे व पर्यटन स्थळाचा दर्जा काढुन घ्यावा. या मागणीसाठी केज येथील सर्व जैन धर्मीय बांधवांनी त्यांचे सर्व व्यवहार बंद ठेवून झारखंड सरकारचा निषेध व्यक्त केला आणि केज तहसील समोर निदर्शने करून नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना निवेदन दिले. निवेदनावर पंकज अन्नदाते, जितेंद्र देवधारे, अजय एखंडे, चंद्रकांत भूमकर, अमित काळेगोरे, अजिंक्य देवधारे, कपूरचंद चोभारकर, शेखर देवधारे, राजाभाऊ घेवारे, कल्याण अन्नदाते, विजय एखंडे, समेद घेवारे, ॲड. अनमोल देवधारे, मनोज काळेगोरे, भागेश अन्नदाते, प्रतीक अन्नदाते, संदीप देवधारे, जितेंद्र काळेगोरे, अजय काळेगोरे, जितेंद्र देवधारे, सचिन नेटके, मयूर मांडीलया, राहुल एखंडे, आकाश भूमकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
