- केज न.प.समोर भोसले सरांचे विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन
केज–
शहरातील उमरी रोडचे काम करून या भागातील नागरीकांचा रहदारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले हे आवाज उठवत आहेत, केज न.प. कडे रस्त्यासाठी उपलब्ध असलेला निधीतून हे काम सुरू करावे या प्रमुख मागणीसाठी आज दि. ५ डिसेंबर रोजी घंटानाद आंदोलन सुरू केले आहे.
हनुमंत भोसले यांनी अनेक वेळा लेखी निवेदन देऊन काम सुरु करण्याची मागणी केली होती परंतु प्रशासन व केज न.प. वेगवेगळे कारणे सांगून या कामाला विलंब लावत असल्याने हे काम सुरू करावे या मागणीसाठी अखेर आज घंटानाद आंदोलन त्यांनी सुरु केले आहे.
——————————
प्रा. हनुमंत भोसले यांनी जनविकास परिवर्तन आघाडीकडून लढवली न.प.निवडणूक
——————————–
केज न.प.जनविकास परिवर्तन आघाडी व काँग्रेस पक्ष यांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे हनुमंत भोसले यांनी न.प. ची निवडणूक जनविकास परिवर्तन आघाडी कडून लढवली आहे. सत्ता आल्यानंतर उमरी रस्त्याचे काम सुरू करण्यात असे आश्वासन जनविकास प.आघाडीकडून या भागातील नागरीकांना दिले गेले जवळपास दिड वर्षे सत्ता स्थापन करून झाले मात्र काम सुरू होत नसल्याने अखेर प्रा.हनुमंत भोसले यांनी घंटानाद आंदोलन केज न.प.समोर सुरू केले आहे.
न.प.प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी या विषयावर काय भुमिका घेतात याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
