Author: विजयराज आरकडे

आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड —- एक नेतृत्वशील युवकाचे महाराष्ट्रातून होत आहे अभिनंदन केज — भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सरचिटणीस पदावर आदित्य पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही निवड पक्षाच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाची ही ठळक निशाणी आहे. —————————— आदित्य पाटील यांची राजकीय कारकीर्द —————————— आदित्य पाटील हे अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्तरावरून सुरू झालेला हा प्रवास आता राज्यस्तरावर पोहोचलेला आहे. त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस, आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ग्रामीण…

Read More

अज्ञानाच्या ‘अ’ पासून आश्चर्याच्या ‘आ’ पर्यंत घेवून जाण्याचं काम सद्गुरु करतात- समाधान महाराज शर्मा; केज येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचा गुरुपोर्णिमा उत्सव आनंदात संपन्न; केज/प्रतिनिधी — केज येथील प.पू.वै.वासुदेव खंदारे गुरुजींच्या कृपाशिर्वादाने चालत आलेला गुरुपोर्णिमा उत्सव यावर्षी देखील विठाई मंगल कार्यालय केज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खंदारे गुरुजींच्या वृंदावन धाम या निवासस्थानी ठाकुर रामकृष्ण परमहंस,शारदा माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व नंतर वृंदावन धाम येथून प.पू.वै. खंदारे गुरुजींच्या पादुका पालखी मध्ये ठेवून विठाई मंगल कार्यालया पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी खंदारे गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरुमाई खंदारे आईंची पाद्य पुजा करण्यात…

Read More

डिजिटल मिडिया परिषदेचा सप्टेंबरमध्ये संभाजीनगर येथे राज्यव्यापी मेळावा; मुंबई : डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा पहिला राज्यव्यापी मेळावा 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली..मेळाव्याचे उद्घाटन राज्यातील पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार राज्यभर झपाट्याने होत आहे.. राज्यातील 30 जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू झाल्या आहेत.. सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.. या मेळाव्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा होणार असून उत्कृष्ट युट्यूब चॅनल आणि पोर्टल…

Read More

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाभार्यास विड्याच्या पानांची सजावट श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केज( प्रतिनिधी) तालुक्यातील प्रतिदेहु श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गरूपोर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाभारा हजारो विड्याच्या पानांनी सजवण्यात आला. संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमे निमित्त आलेल्या भक्तांनी संत तुकाराम महाराजांच्या दर्शना‌‌ बरोबरच गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे आशीर्वादही घेतले. याप्रसंगी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची किर्तन सेवा संपन्न झाली. पावनधाम येथे आलेल्या हजारो भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था सौ.स्मिता चंद्रकांत…

Read More

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी नांदेड प्रतिनिधी नांदेड शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शाळेच्या वतीने पंढरपूरचे देवस्थान विठ्ठल रुक्माई च्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांकडून फुगडी रिंगण टाळ मृदुंगासह यांचा आनंद लुटला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आषाढी एकादशीच दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक श्री कल्याणकर दिगंबर,जाधव सूर्यकांत, शोभा किडे, संध्या सिंदगीकर,सुग्रीव मोरे आदी पालक उपस्थित होते.

Read More

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा खाजगीकरणा विरोधात देशव्यापी संप केज- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संलग्न स्वतंत्र मजदूर युनीयन वतीने बुधवारी दि.09 जुलै रोजी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जे कंपन्यांचे खाजगीकरण चालू आहे त्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात केज तालुका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांनी, सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केज तालुका अध्यक्ष शिवाजी घुले यांनी केले आहे. सदरील संप विद्युत विभागातील सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधात आहे .हा संप बहुजनांचे संविधानिक हक्क कायम ठेवण्यासाठी होत…

Read More

केज पोलिसांनी गोवांशिय प्राण्याच्या व हाडांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला गौतम बचुटे/केज केज पोलिसांच्या पथकाने गोवंशीय प्राणी आणि इतर प्राणी यांचे कत्तल केलेले हाडे यांची वाहतूक करणारात टेम्पो ताब्यात घेतला आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ६ जुलै रोजी पोलीस पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, बीडकडे एक आयशर टैम्पो क्र (एम एच-१२/एच डी-३३४८) येत असून त्या टेम्पो मधून प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यात काही तरी संशयित असावे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, संदीप मांजराने, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस निरीक्षक इनामदार, यांना कारवाईचे आदेश दिले. स्वतः…

Read More

खा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी बीड: बीडचे खा.बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस दि.६ जुलै रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. तालुकास्तरावर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्याबाबत डॉ.संजय राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रूग्णालय बीड यांनी सर्व वैद्यकिय अधिक्षकांना याबाबत पत्र दिले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करयात येते. यामध्ये ० ते ६…

Read More

बीड जिल्ह्यात काँग्रेसकडून नविन तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर; आगामी निवडणुकात काँग्रेस ताकतीने लढण्याचा निर्धार केज- बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्वच तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून बीड जिल्हा काँग्रेसने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली असल्याचे यावेळी सांगितले. या नियुक्त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. रजनीताई पाटील यांच्या सूचनेवरून व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, प्रवीनकुमार शेप, गणेश राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. केज तालुका अध्यक्ष पदी श्री. प्रविण लक्ष्मण खोडसे,बीड ग्रामीणश्री. गणेश आसाराम बजगुडे, परळी वैजनाथ ग्रामीण,अॅड. प्रकाश बापूराव मुंडे,परळी वैजनाथ शहर,श्री. हानिफ करीम सय्यद,अंबेजोगाई…

Read More

जि. प. सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल केज- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनिजवळा, शाळेतील इ .इयत्ता दुसरी ते सहावीच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी एमटीएस ओलंपियाड -2025 या राज्यस्तरीय परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभाग घेतला होता . यापैकी पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर पाच विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे . तसेच उर्वरित पंधरा विद्यार्थीही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत . या पदकविजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज शाळेत आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . हनुमंत गायकवाड आणि प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष श्री .प्रवीण मस्के तसेच…

Read More