Author: विजयराज आरकडे

प्रा.डॉ.शंकर वाघमारे यांना फुले शाहू आंबेडकर अंतरराष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर नेकनूर- प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर येथील मराठी विभाग प्रमुख तथा संशोधन मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. शंकर वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व पटाया इंडियन असोशियन बँकॉक यांच्या वतीने देण्यात येणारा 2024 चा फुले, शाहू,आंबेडकर अंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. डॉ शंकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थयांनी पीएच.डी पूर्ण केली आसून,4 विद्यार्थीयांना ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे 4 पुस्तके व 48 राष्टीय अंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.त्यांनी बौद्ध साहित्य परिषदच्या माध्यमातून 6 अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन महाराष्ट्रत वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली होती. तसेच त्यांनी 3 अखिल भारतीय…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय हवा या मागणीसाठी जनसागर एकवटला छत्रपती संभाजी राजे, जरांगे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना अटक करून फासावर चढवा व या हत्येमागील सुत्रधार शोधून संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि. २८ रोजी बीड येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील जनसागर या मोर्चाला उपस्थित राहीला असल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजी राजे, मनोज जरांगे पाटील, खा. बजरंग सोनवणे, मविआ चे आ. जितेंद्र आव्हाड, आ.सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षिरसागर, आ. विजयसिंह पंडित, तसेच जिल्ह्यातील सर्व…

Read More

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहलीत घेतला सरदेशपांडे हुर्डा पार्टीचा आनंद नांदेड – गोविंदेश्वर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल सरदेशपांडे हुरडा पार्टी परभणी येथे गेली असता इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सरदेशपांडे हुरडा पार्टी येथे शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. या सहलीत विद्यार्थ्यांनी रेन डान्स हॉर्स रायडिंग झोके बैलगाडी ट्री हाऊस घसरगुंडी शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम युक्त खेळ अशा विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच मुलांना जादूगर यांचा शो दाखवण्यात आला यानंतर मुलांना खाण्यासाठी पिझ्झा न्यूडल्स पोहे अशा वेगवेगळ्या आवडीनुसार विशिष्ठ प्रकारच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. सायंकाळी जेवणाची देखील खाण्याचे विविध प्रकार व उत्तम सोय करण्यात आली.शाळेच्या चार भिंतीशिवाय मुलांना निसर्गात फिरायला आवडते सहलीतून…

Read More

आडस येथील कला महाविद्यालयास नॅक मूल्यांकन बी ग्रेड प्राप्त केज- (आडस) तालुक्यातील आडस येथील कला महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले.तपासणीनंतर नॅक समितीकडून कला महाविद्यालयास बी ग्रेड प्राप्त झाला.याबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १४ ) व दि १५ डिसेंबर रोजी नॅक मूल्यांकन तपासणी झाली. नॅक मूल्यांकन समितीचे अध्यक्षा केंद्रीय विद्यापीठ कर्नाटक येथील प्रो.करमला पदमश्री, समिती सदस्य श्री शंकराचार्य विद्यापीठ केरळ येथील प्रो फ्रँसिस ए पी अरकल, समिती सदस्य सोहनलाल दव शासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र पदव्युत्तर महाविद्यालय हरियाणा चे प्राचार्य डॉ. विवेक कोहली यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनासाठी चे सर्व निकष…

Read More

आडस येथील कला महाविद्यालयास नॅक मूल्यांकन बी ग्रेड प्राप्त केज- (आडस) तालुक्यातील आडस येथील कला महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले.तपासणीनंतर नॅक समितीकडून कला महाविद्यालयास बी ग्रेड प्राप्त झाला.याबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १४ ) व दि १५ डिसेंबर रोजी नॅक मूल्यांकन तपासणी झाली. नॅक मूल्यांकन समितीचे अध्यक्षा केंद्रीय विद्यापीठ कर्नाटक येथील प्रो.करमला पदमश्री, समिती सदस्य श्री शंकराचार्य विद्यापीठ केरळ येथील प्रो फ्रँसिस ए पी अरकल, समिती सदस्य सोहनलाल दव शासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र पदव्युत्तर महाविद्यालय हरियाणा चे प्राचार्य डॉ. विवेक कोहली यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनासाठी चे सर्व निकष…

Read More

केज पोलीसांनी रस्त्यावर उभी केलेली वाहने आणि अडथळे हटविले गौतम बचुटे/केज :- बीड येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी जिल्ह्यातील अवैध्य धंदे आणि गुन्हेगारी रोखण्यावर पहिल्या दिवसा पासून सुरुवात केली आहे. तर केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी रस्त्यावर उतरून केज येथून जाणाऱ्या अंबाजोगाई-मांजरसुंबा-जामखेड महामार्ग क्र. ५४८-डी आणि खामगाव-सांगोला महामार्ग क्र. ५४८-सी वरील बसस्टँड परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळंब रोड, केजवर बेशिस्तपणे उभी केलेले वाहने व दुकानदारांनी ठेवलेल्या पाट्या व बोर्ड तसेच हातगाडे हटविली आहेत. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रस्ता अडथळा मुक्त करण्याचे दिला. यावेळी त्यांच्या…

Read More

बीड येथील सर्वपक्षीय मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे; केज येथे मार्केट कमिटी येथे नियोजन बैठक संपन्न केज – केज तालुक्यातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र आणखीही मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा (दि.२८) डिसेंबर रोजी बीड येथे आयोजित केला आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी केज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तुरुंगात टाकावे, यातील मुख्य मास्टरमाईंडला…

Read More

नागपूर येथे होणाऱ्या कला प्रदर्शनात कु. ऋची वैरागे हिच्या चित्रांची निवड गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील जवळबन येथील कु. रुची जयंत वैरागे हिने रेखाटलेल्या पोस्टर कलर मधील पिक्टोरियल डिझाईनच्या दोन चित्रांची नागपूर येथे होणाऱ्या कला प्रदर्शनात निवड झाली आहे. या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील जवळबन ता. केज येथील सौ. अंजली आणि जयंत वैरागे यांची कन्या कु. रुची वैरागे ही संभाजी नगर (औरंगाबाद) येथील राजा वर्मा चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेत आहे. दरम्यान दि. १० जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य कला संचनालय विभागाने आयोजित केलेल्या ६४ व्या कला प्रदर्शनात तिने पोस्टर कलरच्या साहाय्याने रेखाटलेल्या पिक्टोरीयल डिझाईन या…

Read More

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची शिकवण सर्वांच्या कृतीत आली पाहिजे डॉ.हनुमंत सौदागर केज – खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची शिकवण आपल्या सर्वांच्या कृतीत आले पाहिजे असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात साने गुरुजी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्राचार्य विजय शिनगारे, प्रा डॉ नागेश कराळे, अविनाश गालफाडे ,सुजित नायकवडे, सतीश नेहरकर आदी उपस्थित होते पुढे बोलतांना ते म्हणाले शेतकरी, कष्टकरी ,वंचित उपेक्षितांसाठी आयुष्यभर लढा देणारे साने गुरुजी साहित्यातून वास्तवदर्शी जीवन मांडत राहिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सेवाकार्याचा…

Read More

मध्यप्रदेशातील मजुराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जिनिंग फॅक्टरीवर काम करीत असलेल्या मध्यप्रदेशातील परप्रांतीय मजुराच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञातांनी अज्ञात कारणासाठी अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील कृष्णा जीनिंग फॅक्ट्रीरीवर मध्यप्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यातील बडोनी ता. पुनसा येथील एक जोडपे मजुरीचे काम करीत आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. ते सर्वजण जिनिंग फॅक्ट्रिवर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दि. १९ डिसेंबर रोजी त्यांची १६ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी ही दुपारी २:०० वा. सुमारास…

Read More