प्रा.डॉ.शंकर वाघमारे यांना फुले शाहू आंबेडकर अंतरराष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर
नेकनूर-
प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर येथील मराठी विभाग प्रमुख तथा संशोधन मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. शंकर वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व पटाया इंडियन असोशियन बँकॉक यांच्या वतीने देण्यात येणारा 2024 चा फुले, शाहू,आंबेडकर अंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. डॉ शंकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थयांनी पीएच.डी पूर्ण केली आसून,4 विद्यार्थीयांना ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे 4 पुस्तके व 48 राष्टीय अंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.त्यांनी बौद्ध साहित्य परिषदच्या माध्यमातून 6 अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन महाराष्ट्रत वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली होती. तसेच त्यांनी 3 अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदा घेतल्या आहेत.
हा पुरस्कार त्यांना थायलंडची राजधानी बँकॉक येथे 8 जानेवारीला वितरीत करण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कारा प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .