Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपीसह दोघांना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी; सरपंच संतोष देशमुख यांची माहिती देणाराही ताब्यात; फरार आरोपींना मदत करणाराही जेरबंद; कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 4, 2025No Comments3 Mins Read

संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपीसह दोघांना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी;

सरपंच संतोष देशमुख यांची माहिती देणाराही ताब्यात;

फरार आरोपींना मदत करणाराही जेरबंद;

कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार;

गौतम बचुटे/केज ,:-

संतोष देशमुख हत्याकांडातील पुणे येथून दोन आणि कल्याण येथून एक असे तीन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
या बाबत ची माहिती अशी की, मागील २५ दिवसा पासून संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे पोलिसांना जंग जंग पछाडून सापडत नव्हते. यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आलेली होती. तरीही आरोपी पकरण्यात तपास पथकाला यश येत नव्हते. त्या नंतर त्यांना आर्थिक रसद पुरवणारा कोण?
हे समोर येत नव्हते. दरम्यान सुदर्शन घुले आणि डॉ. संभाजी वायबसे यांचे एका भांडण व मारमारीच्या प्रकरणात संबंध आले होते. म्हणून मग तपास यंत्रणांनी संभाजी वायबसे याला नांदेड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तपासाला खरी गती मिळाली.
त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती वरून पुणे येथील बालेवाडी परिसरातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला ताब्यात घेतले. तर कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे. तसेच कल्याण येथून ताब्यात घेतलेला सिद्धार्थ सोनवणे हा आरोपी ज्या दिवशी संतोष देशमुख यांचे हत्याकांड झाले. त्या दिवशी संतोष देशमुख यांची इत्यंभूत माहिती सुदर्शन घुले यांना दिली होती. सिद्धार्थ सोनवणे हा या प्रकरणात महत्त्वाचा गुन्हेगार असल्याचे माहित झाले. सिद्धार्थ सोनवणे हा १० डिसेंबर रोजी झालेल्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेला होता. तसेच तो संतोष देशमुख यांचा ११ डिसेंबर रोजी रात्री दीड ते दोन वा. च्या दरम्यान झालेल्या अंत्यविधीला देखील हजर होता. त्या नंतर त्याला त्याने सुदर्शन घुले यांना संतोष देशमुख यांची माहिती पुरविली असल्याने पोलीस आपल्यालाही पकडतील; या भीतीने तो परांगत झाला. त्या नंतर तो कल्याण येथे एका उसाच्या गाडीवर काम करीत होता. या दरम्यान त्याने वेगवेगळे चार सिम कार्ड बदलून मोबाईल वापरत होता. या सर्व प्रकारची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेऊन त्याचे निश्चित माहिती घेत त्याला ताब्यात घेतले.
मागील २५ दिवसा पासून संतोष देशमुख यांच्या खुनातील जे मुख्य आरोपी होते त्यांना पोलिसांना ताब्यात यश मिळाले असून यातील आता एकमेव आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. तीनही आरोपींना प्रचंड पोलीस बंदोबस्त पोलिसांनी त्यांना केज येथील क स्तरीय न्यायालया समोर हजर केले. असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस व्ही. पावसकर यांनी त्या तिघांनाही १८ जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी ठोठावली आहे. यावेळी सहाय्यक सरकारी अभियंता म्हणून ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने ॲड. अनंत तिडके यांनी काम पाहिले
——————————–
सिद्धार्थ सोनवणे साळसूद असल्याच्या आविर्भावात :- सिद्धार्थ सोनवणे हा मारेकऱ्यांना माहिती देऊनही संतोष देशमुख यांना न्याय द्या म्हणून केलेल्या रस्ता रोकोसह अंत्यविधीला देखील हजर होता. सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सहभाग असल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला.
———————————
न्यायालयात काय घडले :-
सरकारी वकील आणि न्यायालया समोर हत्याकांड वापरले शस्त्र आणि साहित्य जमा करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी जास्तीत जास्त देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलाने केली. त्यावर निरीक्षण नोंदविताना न्यायालयाच्या लक्षात आले की, खुना सारख्या गंभीर प्रकरणात देखील आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसून येत नाही. म्हणजेच ते सराईत गुन्हेगार आहेत असे निरीक्षण नोंदविले.
——————————-
आता फक्त कृष्णा आंधळे फरार
:- या प्रकरणात आता गुन्हा दाखल असलेला कृष्णा आंधळे हा बाहेर असून ती सुद्धा लवकरच ताब्यात घेतला जाईल आणि आरोपींना मदत करणाऱ्यांची साखळी सोडून त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 166
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 3
Total Users : 147133
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.