Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

प्राचार्य राहुल गदळे यांच्या दहिफळ वडमाऊली येथील घरी दरोड्याचा प्रयत्न दोन विना नंबरच्या गाड्यातुन आले होते दरोडेखोर

By March 24, 2024No Comments2 Mins Read

प्राचार्य राहुल गदळे यांच्या दहिफळ वडमाऊली येथील घरी दरोड्याचा प्रयत्न

दोन विना नंबरच्या गाड्यातुन आले होते दरोडेखोर

गौतम बचुटे/केज :- राष्ट्रवादी भाजपचे नेते आणि काळेगाव घाट येथील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राहुल गदळे यांच्या दहिफळ वडमाऊली येथील घरावर अज्ञात सात ते आठ लोकांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या शेजाऱ्यांमुळे त्यांचा प्रयत्न फसला.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील राष्ट्रवादी भाजपचे नेते आणि काळेगाव घाट येथील महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांचे वडील सखाहरी गदळे तात्या हे दहिफळ वडमाऊली येथील राहत असल्या घरी दि. २३ मार्च रोजी मध्यरात्री घरा समोर विना नंबरच्या दोन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून सात ते आठ अनोळखी दरोडेखोर आले. त्यातील एकाने त्यांच्या घरा समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी त्यांच्या घराशेजारी असलेल्या शेजाऱ्यांना चाहूल लागल्याने दरोडेखोर घरात प्रवेश न करता पळून गेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान त्या चोरट्या पैकी दोघांच्या अंगावर खाकी रंगाचे कपडे असल्याची चर्चा आहे.

प्राचार्य प्रा. राहुल गदळे यांच्या तक्रारी वरून दि. २४ मार्च रोजी केज पोलिस ठाण्यात सात ते आठ अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. १४४/२०२४ भा. दं. वि. १४७, १४८, १४९ आणि ४५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 64

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 4 0 2
Total Users : 149402
Views Today : 15

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.