Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

जीवन विकास शिक्षण मंडळ केजच्या वतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा संपन्न महिलांसाठी पुरुषांची सहानुभूती हीच खरी ऊर्जा असते- *शैलाताई इंगळे*

By March 13, 2024No Comments4 Mins Read

जीवन विकास शिक्षण मंडळ केजच्या वतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा संपन्न

महिलांसाठी पुरुषांची सहानुभूती हीच खरी ऊर्जा असते- *शैलाताई इंगळे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*केज प्रतिनिधी: दि. १३ मार्च-* केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तुत्वान तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा गुणगौरव सोहळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. या शाळेच्या प्रांगणामध्ये अत्यंत हर्षोत्साहत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ. शैलाताई इंगळे, अध्यक्षा- शालेय व्यवस्थापन समिती स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. केज तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. जी. बी. गदळे, सचिव- जीवन विकास शिक्षण मंडळ केज शाळेचे मु.अ. मा श्री. बाळासाहेब तिडके हे उपस्थित होते. याप्रसंगी धारूर येथील जनता माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सीमा भास्कर शिनगारे, केज येथील रहिवाशी तथा जगद्गुरु नरेंद्र महाराज संप्रदायातील रत्नागिरी जिल्ह्यातील नानिज या पिठाच्या प्रवचनकार पदवी प्राप्त श्रीमती. पद्मिनी तुकाराम तांदळे, तसेच महावितरण कार्यालय तेलगाव, येथे कार्यरत असणाऱ्या तथा वीज कामगार सहकारी पतसंस्था, अंबेजोगाई येथील अध्यक्षा श्रीमती. उषा रमेश तपसे या सत्कारमूर्तींचा मानाचा फेटा बांधून, संस्थेचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( मा. वि. ) स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (प्रा. वि. ) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज, तसेच स्वामी विवेकानंद बालक मंदिर केज, या सर्व शाळेतील जवळपास ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिका व शिक्षकेतर भगिनींचा सत्कार सोहळा अत्यंत हर्षोत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रारंभीस शाळेतील सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे यांनी उपस्थित पाहुण्यांचे शब्द सुमने करणे या गीत गाऊन स्वागत केले. प्रस्ताविक मु.अ. बाळासाहेब तिडके यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय श्री. दत्ता सत्वधर यांनी दिला.

पुढे सर्व महिला भगिनींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यामध्ये-
*स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा वि. या शाळेतील-* शिवनंदा मुळे, पल्लवी राऊत, गौरी जगताप, प्रतीक्षा गुंड, सुनिता इरे, वैशाली घाडगे, रिना उनवणे इत्यादी.

*स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रा. वि. केज या शाळेतील-* सुरेखा डांगे, राजश्री शिंदे, अपर्णा देशपांडे, पद्मावती जोशी, बेबी भोरे, हजारे सुप्रिया, ऋतुजा कळेकर, रेवती देशमुख, राधा घुगे, इत्यादी.

*स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळेतील-* नम्रता काळे, अंजली विटेकर, स्वाती तपसे, स्नेहा कल्याणकर, श्वेता काळे, मनीषा राऊत, विभा कल्याणकारी, सोनिया सावंत, दिपाली नाईकवाडे, आशा जाधव, स्वरांजली बेदरे, इत्यादी.

*स्वामी विवेकानंद बालक मंदिर केज या शाळेतील-* उषा पत्की, अश्विनी लोंढे, वैशाली राऊत, इत्यादी.

*शिक्षकेतर कर्मचारी महिला भगिनींमध्ये-* विजयमाला राऊत, छाया गुंड, भाग्यश्री गुंड, संगीता कोकाटे, गोंडाबाई गोरे, अश्विनी दिग्रसकर, वैशाली थोरात, गोरे ताई, इत्यादी.

याप्रसंगी सत्कारमूर्ती भगिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना सिमा भास्कर म्हणाल्या, जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई, फातिमा शेख यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत, २१ व्या शतकाकडे झेप घेतानाही महिलावरील अत्याचार संपलेला नाही तेव्हा महिलांनी प्रचंड आत्मविश्वासाने जगले पाहिजे. सुप्त गुणांना खतपाणी घातले पाहिजे, शुद्ध आचरणाने संपूर्ण देश आत्मनिर्भर बनेल. शेवटी त्या म्हणाल्या, जिच्या हाती शिक्षणाची दोरी, ही जगाशी उद्धारी.

याप्रसंगी पद्मिनी तांदळे म्हणाल्या, आपण ध्येय प्राप्तीसाठी सतत संघर्ष केला पाहिजे. आपल्या उनिवा जाणून त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, आयुष्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे, तुलनात्मक जीवन जगताना संस्कारक्षम शिक्षण घेतले पाहिजे.

याप्रसंगी उषा तपसे बोलताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित केला पाहिजे, पालकांनी बारकाईने मुलांची निरीक्षण केले पाहिजे, त्यांचा नियमित अभ्यास घेतला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अध्यक्षीय समारोपात शैलाताई इंगळे यांनी जागतिक महिला दिन का साजरा करावा याची पार्श्वभूमी सांगताना म्हणाल्या, किमान या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईचा छोटेशे गिफ्ट अथवा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला पाहिजे. कारण यातून तिचा प्रचंड आत्मविश्वास वाढतो तसेच पुरुषांच्या सहानुभूतीमुळे तिला एक वेगळी ऊर्जा मिळते. याप्रसंगी सर्व सत्कारमूर्ती महिला भगिनींना त्यांनी जिजामाता, सावित्रीबाई व झाशीची राणी यांची उपमा दिली. शेवटी त्या म्हणाल्या, एखाद्या चांदणी सारखे बनू नका, की सर्वांची नजर पडेल, सूर्यासारखे तेजस्वी बना की सर्वांची नजर झुकेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले. तर आभार शाळेतील सहशिक्षिका सौ. शिवनंदा मुळे यांनी मानले.

Post Views: 143

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.