सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची गुटख्यावर धाड
१ लाख १२ हजाराचा मुद्देमाल ताब्यात
गौतम बचुटे-/ केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने नांदुरघाट ता. केज येथे कारवाई करून १ लाख १२ रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
दि.१२ मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नांदूरघाट येथील महेश रमेश तारळकर रा. (नांदुरघाट ता. केज) हा स्वतःचे आर्थीक फायदयासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा किरायाने गोडाऊन करुन त्यामध्ये ठेवुन सदर प्रतिबंधीत गुटख्याची बेकायदेशिर चोरटी विक्री करित आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि त्यांच्या पथकातील पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार शमीम पाशा यांना सदर ठिकाणी जावुन छापा मारण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि त्यांच्या पथकातील पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार शमीम पाशा यांनी नांदूरघाट येथील गोडावूनवर छापा मारून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले १ लाख १२ हजार २७२ रु रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. पोलिसांनी महेश रमेश तारळकर याला ताब्यात घेऊन कारवाई केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार शमीम पाशा यांच्या पथकाने केली आहे.
