*नातवाने आजोबाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून केला खून !*
*देवदर्शन करून बाहेर पडत असलेल्या आजोबाचा गणेश मंदिरा जवळच केला खून !*
गौतम बचुटे/केज :- केज येथे २५ वर्षीय नातवाने देवदर्शनासाठी आलेल्या त्याच्या चुलत आजोबावर गणेश मंदिराच्या परिसरात कोयत्याने डोक्यात व मानेवर सपासप वार करून जागीच खून केला आणि स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला.
दि. ५ मार्च मंगळवार रोजी केज येथील कानडी रोडवर असलेल्या सिद्धी विनायक गणेश मंदिरात केज येथील गिरधारी किसनलाल शिल्लक वय (६० वर्ष) हे मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. ते सकाळी ७:३० वा. देवदर्शन करून मंदिराच्या बाहेर येत असताना मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेला त्यांच्या पुतण्याचा २५ वर्ष वयाचा मुलगा नात्याने त्यांचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक (रा. केज) याने मंदिराच्या जवळ असलेल्या आडबाजूला ओढत नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर सपासप वार केले. त्याने डोक्यात आणि मानेवर एकूण तेरा वार केले आहेत. यात गिरधारी किसनलाल शिल्लक यांची डोक्याची कवटी फुटून मानेच्या शिरा तुटल्या आहेत. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले त्यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे.
————————————————-
*मारेकरी दोन दिवसा पासून होता पाळत ठेवून :-* आजोबाचा खून करणारा त्यांचा नातू रोहित शिल्लक हा आजोबा गिरधारी शिल्लक हे दररोज सकाळी सिद्धी विनायक गणेश मंदिरात देवदर्शनाला येत असतात आणि सकाळी तेथे माणसांची वर्दळ कमी असते. तसेच मंदिराच्या बाजूला आडोसा आहे. याची सर्व माहिती असल्याने मारेकरी रोहित शिल्लक हा त्यांच्यावर दोन दिवसापासून पाळत ठेवून होता. शेवटी आज देवदर्शनासाठी आलेल्या चुलत आजोबाचा त्याने काटा काढला.
————————————————
