Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पुस्तकी अभ्यासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे– प्रा अर्चनाताई आडसकर जय भवानी कन्या प्रशाला केज येथे व्हर्च्युअल डिजिटल हॉल(Virtual Digital Hall ) च्या उदघाटण प्रसंगी व्यक्त केले मत

By February 24, 2024No Comments3 Mins Read

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पुस्तकी अभ्यासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे– प्रा अर्चनाताई आडसकर

जय भवानी कन्या प्रशाला केज येथे व्हर्च्युअल डिजिटल हॉल(Virtual Digital Hall ) च्या उदघाटण प्रसंगी व्यक्त केले मत

केज/प्रतिनिधी

जय भवानी कन्या प्रशाला केज येथे आज दिनांक 24.02.2024 रोजी व्हर्च्युअल डिजिटल हॉलचे उदघाटण श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस च्या संचालिका प्रा अर्चनाताई आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले.अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून सदरील डिजिटल हॉलचे निर्मिती करण्यात आलेली आहे.सदरील कार्यक्रमासाठी पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
प्रा अर्चनाताई आडसकर यांनी याप्रसंगी बोलताना शाळेच्या प्रगतीचा आवर्जून उल्लेख करीत सर्व शिक्षक वृंदाचे कौतुक केले,तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते मैत्रीपूर्ण असावे परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणे गरजेचे असले सांगितले. तसेच सध्याच्या काळामध्ये मोबाईलचा अतिवापर विद्यार्थिनींनी टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलचे दुष्परिणाम समजावून सांगावेत असे आवर्जून सांगितले.जय भवानी कन्या प्रशाला मधील या डिजिटल हॉलच्या उपयोगाने विद्यार्थिनींच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडेल असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी पालकातर्फे विधीज्ञ मुंडे साहेब यांनी सदरील प्रकल्पाचे कौतुक करून सातत्याने शाळा घेत असलेल्या विविध अभिनव उपक्रमाचे कौतुक केले,श्री तपसे अण्णा यांनी याप्रसंगी माजी आमदार कै बाबुरावजी आडसकर यांची आठवण काढत तात्यांची मुलींच्या शिक्षणाप्रती असलेली तळमळ पालक व विद्यार्थिनीं समोर मांडली. जय भवानी कन्या प्रशाला केज येथील सर्व कर्मचारी घेत असलेल्या मेहनती बद्दल त्यांचे अभिनंदन केले. पालकांच्या वतीनेच श्री मस्के साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कारच्या शिदोरीचे महत्व पटवून सांगण्याची गरज असल्याचे उदाहरणासहित सांगितले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख पी एम यांनी चालू वर्षात शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला व आज उदघाटण होत असलेल्या व्हर्च्युअल डिजिटल हॉलचे महत्व सांगून त्याचा वापर विद्यार्थिनींना कसा होणार आहे हे पालकांना व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जगताप गीता मॅडम ही उपस्थित होत्या.

सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब गाढवे, घुले साहेब,जाधव सर, केशव राऊत, संदीप तरकसे ,अशोक गपाट, इंगळे अखंड राव, इंगळे कैलास गाढवे, कापरे साहेब, बाळासाहेब आढाव, समुद्रे साहेब,जाधव साहेब, खेत्रे साहेब, पठाण आसिफ, राधा आगरकर, निकिता पवार, पूजा लोखंडे, ज्योती गायकवाड, सुकांता गायके, आखाडे मॅडम व इतरही पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अनुक्रमे  श्री खुळे के व्ही,
श्री नाईकनवरे सर, श्री बचुटे सर, श्री देशमुख व्ही पी सर, श्री गिरी सर, सौ पवार मॅडम, सौ चोंदे मॅडम, सौ मोरे मॅडम, सौ जाधव मॅडम, सौ खतिले मॅडम, शिंदे सर, श्री जाधव सर , श्री गिराम मामा,  यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे रेखीव सूत्रसंचालन श्री गिरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री खुळे के व्ही यांनी करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Post Views: 43

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.