काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
ध्येय निश्चित ठेवल्यास यश नक्कीच मिळेल -डॉ. हनुमंत सौदागर
केज दि २२(प्रतिनिधी )
केज तालुक्यातील काळेगाव( घाट) येथील काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या निरोप समारंभ साठी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे डॉ.हनुमंत सौदागर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. राहुल गदळे होते. सर्वप्रथम सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना या शाळेमधील शिक्षकांनी आम्हाला इयत्ता पाचवीपासून आमच्या आई-वडिलांसारखे सांभाळून आम्हाला योग्य ते वेळोवेळी मार्गदर्शन केले प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या विषयात चांगले शिक्षण दिले त्याबद्दल आम्ही सर्व सरांचे अत्यंत ऋणी आहोत . अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. हनुमंत सौदागर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यास व त्यांनी केलेल्या अभ्यासाविषयी विचारून पुढील मार्गदर्शन केले. डॉ हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित केल्याशिवाय यश संपादन करता येत नाही याचे अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबरोबर या शिक्षणाचा फायदा आपल्या व्यवहारीक जीवनामध्ये केला पाहिजे कारण आपण समाजामध्ये राहत असताना समाजातील प्रत्येक घटकाशी आपला संबंध जोडलेला असतो. शिक्षण घेत असताना आपण सर्वप्रथम आपला मार्ग शोधला पाहिजे तरच आपण त्या मार्गावर चाललो तर आपल्याला ते ध्येय साकार करता येईल. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांशी प्रमाणिक राहून अभ्यास करावा जेणेकरून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता येईल. अशा प्रकारचे अनमोल मार्गदर्शन डॉ हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांना केले. व आई विषयी कवितेतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राहुल गदळे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर परीक्षेत कोणत्याही प्रकारचा प्रश्न जरी आला तरी त्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यास अधिक विचार करण्याची गरज लागत नाही तसेच आपण या शाळेचे विद्यार्थी आहात आणि पुढेही राहतील व तुमच्यासाठी कोणत्याही अडचन आली तरी आपणास आश्वासन देतो की, आपल्यासाठी तूमची शाळेतील अडचन सोडविण्यासाठी सदैव तयार आहे. येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. जावेद शेख यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो
