बोबडेवाडी जि प शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम

केज दि १६(प्रतिनिधी)
तालुक्यातील बोबडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार रोजी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी चिमुकल्या विद्यार्थी कलाकारांनी विविध गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.प्रेक्षकांनी विद्यार्थी कलाकारांच्या गीतावर ठेका धरला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास बोबडे,कार्यक्रमाचे उद्घाटक पत्रकार गौतम बचुटे,डॉ हनुमंत सौदागर, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे,सरपंच सुमित्राताई तोंडे,मंगरूळकर मोहन बोबडे,नवनाथ क्षीरसागर,बाळासाहेब तोंडे,बाबासाहेब बोबडे,भारत बोबडे , पारधीवस्ती शाळेचे मुख्याध्यापक अमोल बोबडे,श्रीमती गायकवाड आदींच्या हस्ते झाले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी भक्तिगीते,लोकगीते,वेशभूषा करून सादर केली.पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का,ही नवरी असली ,दैवत छत्रपती या गीतानी धम्माल केली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इंगळे
श्रीमती कुलकर्णी यांनी केले.
