कमलेश मीना यांच्या पथकाच्या धाडी सत्र सुरू..!
गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने केज शहरात सुरू असलेल्या पाच मटका बुक्क्यावर धाडी टाकून मुद्देमाल ताब्यात घेतला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी अवैद्य धंद्या भोवतीचे फास आवळायला सुरुवात केली आहे.
दि.१३ फेब्रुवारी रोजी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, केज शहरामधील बस स्टँडच्या पाठीमागे सोनार गल्लीमध्ये मटका सुरू असून काही लोक मटक्यावर स्वतःच्या फायद्यासाठी मटक्याचे आकडे घेऊन मटका खेळत व खेळवीत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्या वरून त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच त्यांच्या पथकातील पथकातील बाबासाहेब डापकर, उल्हास राठोड, विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गीते, गोविंद मुंडे यांनी सदर माहिती मिळालेल्या पाच ठिकाणी एकाच वेळी छापा मारला. या छाप्यात कमलेश मीना यांच्या पथकाने मारून रोख १५ हजार ४० रु आणि मुद्देमाल जप्त करून पाच आरोपीवर केज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या कारवाईमुळे अवैद्य धंदे करणारे आणि त्यांचे हस्तक धास्तावले आहेत.
