वसंत प्राथमिक शाळेच्या प्रभातफेरीत अवतरले राम, लक्ष्मण,सिता
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम, टिपरी, नृत्य व वेशभुषेने जिंकले पालक व प्रेक्षकांचे मन
केज-
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील वसंत प्राथमिक शाळेने राम, लक्षमन, सिता यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी यांची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली. यावेळी हनुमान व वानरसेना तसेच लेझीम, टिपरी नृत्य सादरीकरण करण्यात आले.
सर्व केजवासीय पालक वर्गातून विद्यार्थी व शाळेचे कौतुक केले जात आहे.
शहरातील मुख्य रस्ता, कानडी रोड, समर्थ नगर, वकील वाडी भागातून ही प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी उपस्थित नागरिक व पालकांनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी या प्रभातफेरीचे पुष्प उधळून स्वागत करण्यात आले. अनेक पालक व नागरीकांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊचीही व्यवस्था केली होती.
ही प्रभातफेरी व संपूर्ण रामलल्लाचा देखावा यशस्वी सादरीकरण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, अंगणवाडी शिक्षिका हजारे मॅडम, खाऊ वाटप करणार्या कविताताई व महिला पालक सौ. फरके व इतर पालकांनी विशेष परिश्रम घेतले.
