टोल नाक्यावर चोरट्यांनी केली पेनाची चोरी
गौतम बचुटे/केज :- केज येथे केज बीड उमरी फाटा रोडवर गंगा माऊली शुगर करखान्या जवळ असलेल्या टोल नाक्यावर चोरट्यानी पेनाची चोरी केली.
दि. २० जानेवारी रोजी ट्रक चालक नाशेद जाकीर सय्यद (रा. शिवाजी नगर निलंगा जि. लातूर) हा त्याच्या ताब्यातील ट्रक नं. (एम एच-२०/ ई जी-०६३०) मधून सेलो कंपनीचे पेनाचे बॉक्स घेऊन जात होता. त्यावेळी पहाटे ४:०० वा. च्या सुमारास केज- बीड रोडवरील केज येथील उमरी फाटा रोडवरच्या गंगा माऊली शुगर कारखान्या जवळ असलेल्या टोल नाक्यावर अज्ञात चोरट्यानी ट्रकची ताडपत्री तीक्ष्ण हत्याराने कापून आतील सेलो कंपनीचे १९ पेनाचे बॉक्स चोरून नेले. त्याची किंमत १९ हजार रु. एवढी आहे.
चोरीची घटना निदर्शनास येताच ट्रक ड्रायव्हर नाशेद जाकीर सय्यद यांच्या तक्रारी वरून दि. २० जानेवारी रोजी केज पोलीस ठाण्यात अज्ञात पेन चोरट्या विरुद्ध गु. र. नं. २७/२०२४ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सुधाकर दौंड हे तपास करीत आहेत.