माणूस माणसाला चावला .. केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यात भांडणात मारहाण करून एकाच्या बोटाला कडाडून चावा घेतल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, सांगवी (सा.) ता केज येथील अमोल शिवाजी धस हे दि. १८ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वा. च्या सुमारास पिंपळगाव फाटा येथिल अनिल बिक्कड यांच्या हॉटेलवर थांबले होते. त्यावेळी शिवाजी गोवर्धन धस, गोवर्धन आण्णा धस, दत्तात्रय रामा धस हे तेथे आले आणि अमोल धस यांना म्हणाले की, तू बंडू प्रल्हाद केदार याच्या जवळ त्यांच्या बद्दल काय म्हणालास ? असे म्हणून त्यांनी चापटा-बुक्याने लाथाने मारहाण केली आणि शिवाजी गोवर्धन धस याने अमोल धस याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोट तोंडात धरून दाताने जोरात चावा घेवून बोट फोडून जखम केली. तसेच गाडी अंगावर घालून चेंगरून जिवे मारीन अशी धमकी दिली.
या प्रकरणी अमोल धस यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरूनशिवाजी गोवर्धन धस, गोवर्धन आण्णा धस, दत्तात्रय रामा धस यांच्या विरुद्ध गु र नं २५/२०२४ भा दं वि ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत