बुवासाहेब पाटील विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
केज : प्रतिनीधी
मीराबाई शिक्षण संस्था माळेगाव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा विक्रम बप्पा मुंडे यांच्या आदेशानुसार व संस्था सचिव मा. विजयकांत भैय्या मुंडे जि.प सदस्य विडा ,व मा .संदिप भैय्या पाटील मा पं .स .सभापती केज, मा .अतुलदादा मुंडे सरपंच देवगाव यांच्या मार्गदर्शना खाली दिः 10 जानेवारी 2024 ते दि 13 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली .
या सहलीत 40 विद्यार्थी , 3 शिक्षक व 1 शिक्षिका अशा 1 बस मधून
विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला
सहलीचा प्रवास श्री क्षेत्र पंढरपूर , कोल्हापूर , जोतीबा , पन्हाळा , कन्हेरी मठ . पाचगणी , प्रतापगड , महाबळेश्वर , कात्रज प्राणी संग्रहालय , शनिवार वाडा , देहू आळंदी शिक्रापूर जामखेड मार्गे शिंदी येथे परत आली .
सहली मधून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व ऐतिहासिक स्थळ , पर्यटण स्थळ , देवदर्शना चा आनंद घेतला .
या 4 दिवसाच्या नियोजनासाठी बुवासाहेब पाटील माध्य. व उच्च माध्य .विद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक श्री सदाशिव (आबा ) मुंडे सर , स्वतः सहली सोबत राहून नियोजन केल्या मुळे सहल हर्ष उल्हासात तसेच शांततेत पार पडली .
शाळेतील शिक्षक – श्री . नितीन पाटील , श्री . विनायक घोळवे सर , महिला प्रतिनीधी – बी. एल पतंगे
यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
रा . प . धारूर आगाराचे बस चालक
श्री . संदिप गुटे साहेब यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना व्यवस्थित बस चालवून सुरक्षीत परत आणल्या बद्दल समस्त शिंदी , गप्पेवाडी , नामेवाडी , घाटेवाडी , काशिदवाडी
येथील ग्रामस्थ व पालक यांनी कौतूक केले .
