फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पन्नास हजाराची मागणी
गौतम बचुटे/केज :- फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेने दुसऱ्या महिलेला पन्नास हजाराची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथील एका महिलेने हिने दि. ४ जानेवारी रोजी तिच्या ओळखीच्या महिलेच्या घरी जाऊन त्यांना तिचे एका व्यक्ती सोबतचे एकत्रित फोटो दाखविले आणि अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. जर ते टाळायचे असतील तर पन्नास हजार रु. ची मागणी केली. तसेच अतिप्रसंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या वरून त्या दोघीत शाब्दिक चकमक झाली. वास्तविक त्या महिले सोबतच्या फोटोतील व्यक्ती ही फिर्यादी महिलेच्या जावयाचा आतेभाऊ आहे.
फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून दि. ६ जानेवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून त्या महीलेविरूध्द गु. र. नं. ०९/२०२३ भा. दं. वि. ३८४, ३८८, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रुक्मिण पाचपिंडे या करीत आहेत.