जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
केज प्रतिनिधी:
दि. ३ जानेवारी-जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व उपक्रमशिल कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेच्या प्रांगणात दि. ३ जानेवारी वार बुधवार रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत हर्षोत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री. गिन्यानदेव गदळे सचिव- जीवन विकास शिक्षण मंडळ केज तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुरेखा धस सहा. पोलीस निरीक्षक- प्रभारी मानवी तस्करी विरोधी युनिट बीड, तसेच मा. प्रा. स्नेहल पाठक निवृत्त उपप्राचार्या- श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव या उपस्थित होत्या. तर इतर मान्यवरांमध्ये संजय चौरे सर केंद्रप्रमुख केज, नारायण अण्णा अंधारे, राऊत सर सेवानिवृत्त मु.अ. कानडी माळी, श्री हनुमंत घाडगे सेवानिवृत्त शिक्षक तथा अध्यक्ष- शालेय व्यवस्थापन समिती स्वा. वि. स्वंयअर्थ सहाय्यीत, वसंत शितोळे मु.अ. प्राथमिक विभाग, प्रा.शंकर भैरट स्व. प्रमोद महाजन महाविद्यालय केज, प्रभारी मु.अ सौ. शिवनंदा मुळे तसेच सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेतील सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे व त्यांचे वडील श्री शिवाजी समुद्रे यांच्या स्वागत गीताने झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. हनुमंत घाडगे यांनी दिला.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमुर्तींना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये- पठाण मुमताज करीमखान- विस्तार अधिकारी केज/अंबाजोगाई, कुलकर्णी हेमलता मधुकर सहशिक्षिका- बोबडेवाडी, शिंदे मंदाकिनी शंकरराव सहशिक्षिका- आगरकरवस्ती कानडीमाळी, दरबारे धम्मदिपा नरसिंगराव केंद्रप्रमुख- सारणी, जाधवर छाया लक्ष्मण सहशिक्षिका- जिवाचीवाडी, शिंदे ज्योती रंगनाथ सहशिक्षिका- तांबवा, गुंड प्रतिक्षा राजेंद्र सहशिक्षिका- स्वा. वि. वि. मं. केज.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून तुळजापूर येथील मराठवाडा विभागीय पातळीवरील सामान्य व वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पियुष जितेंद्र रेवनवार व सय्यद जोयाफातेमा जुबेर यांना सामान्य ज्ञान या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले तर दुर्गादास विलास नेहरकर याने द्वितीय पारितोषिक पटकाविले. शिवम सुग्रीव बेडसकर यास वक्तृत्व स्पर्धेत उत्तर्जनार्थ पारितोषिक मिळाले. तसेच त्यांचे मार्गदर्शक सहशिक्षक श्री दत्ता सत्वधर यांचाही या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच याच शाळेचा १० वी ब मधील विद्यार्थी गिरीश राहुल ठोंबरे याने गोल्डन वे टू द डोअर ऑफ युनिव्हर्स हे पुस्तक लिहिले. तेव्हा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी सर्व सत्कारमूर्तींनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील एकूण जडणघडणीचा प्रवास याप्रसंगी व्यक्त होताना आपल्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका सहा. पो. नि. सुरेखा धस जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या करिअरचा गोल निश्चित केला पाहिजे. तसेच मोबाईलचा वापर करताना आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच कौटुंबिक निर्णय प्रक्रियेमध्ये मुलींचे म्हणजे स्त्रीचे मत घेतले पाहिजे.
याप्रसंगी प्रा. स्नेहल पाठक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बालपणीच्या एका प्रसंगातून अन्यायाविरुद्ध आपण कसे लढले पाहिजे हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी त्या म्हणाल्या आई-वडिलांची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेण्याएवढी श्रीमंती दुसरी कोणतीच नाही.
अध्यक्षीय समारोपात मा. गिन्यानदेव गदळे यांनी संस्थेच्या पायाभरणीपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यातून ही संस्था उभी राहिली. तसेच याप्रसंगी शाळेचा गुणात्मक आलेख उंचावण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अपर्णा देशपांडे मॅडम यांनी केले. तर आभार शिवनंदा मुळे मॅडम यांनी मानले.
