सारणी जि. प .शाळेत महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न
केज –
तालुक्यातील सारणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमि शनिवार रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक जनार्दन सोनवणे, प्रमुख उपस्थिती सरपंच पती संतोष सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पठाण ,स्पर्धेसाठी परीक्षक कवी हनुमंत घाडगे ,डॉ हनुमंत सौदागर, केंद्रीय मुख्याध्यापक अभिजीत शिंदे, मुख्याध्यापक एस एम सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विचार मांडले प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बाल विद्यार्थ्यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे विचार वक्तृत्व स्पर्धेतून मांडले. अध्यक्ष जनार्दन सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात असे मत संतोष सोनवणे यांनी व्यक्त केले. आजचे बाल विद्यार्थी महात्मा फुलेंचा आदर्श स्वीकारत आहेत असे मत श्रीमती पठाण यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक ए एन नखाते यांनी केले तर आभार सोनवणे व्ही व्ही यांनी मानले
कार्यक्रमाचे नियोजन ए एस बनसोडे, राजगुरू पी डी आदींनी नियोजन केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
