केज-मांजरसुंबा रोडवर पोलीस आणि गुंडात भर दिवसा थरार !
अवैद्य देशी कट्टा ताब्यात घेत असताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न : चौघांना घेतले ताब्यात
गौतम बचुटे/केज :- विनापरवाना अवैद्यरित्या देशी कट्टा घेऊन दहशत माजवून तो विक्री करण्यासाठी जात असलेलली गाडी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या आंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून देशी कट्टा व जिवंत काडतुसासह चौघांना ताब्यात घेतले.
दि. २० ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सन्नी आठवले व त्याचा भाऊ अक्षय आठवले यांनी मद्यप्रदेशातून देशी गावठी कट्टे आणून दहशत माजवून ते विक्री करण्यासाठी घेऊन येत आहे. अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार झपकर, पोलिस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक शेळके यां ना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार झपकर, पोलिस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक शेळके आणि गृहरक्षक दलाचे जवान सारूक व आंधळे यांना सोबत घेऊन दोन खाजगी वाहनाने ते गेवराईकडे रवाना झाले. पोलीस पथकाला गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे संभाजीनगर कडून येणारी एक राखाड्या रंगाची मारूती सुझुकी स्विफ्ट ही गाडी क्र. (एम एच-१६/ बी एच-३१३६) ही संशयित गाडी बीडच्या दिशेने येताना दिसली. परंतु रस्त्यावर दुभाजक असल्याने पोलीस पथकाची गाडी वळून येई पर्यंत संशयित गाडी पुढे निघून गेली होती. नंतर पोलिसांनी तिचा पाठलाग केला. सदर संशयित गाडी ही बीड बायपास, मांजरसुंबा व नेकनूर कडून पुढे केजकडे जात असताना पोलिस पथकाने त्या गाडीला बरड फाट्या जवळ ओव्हरटेक करू रेणू पेट्रोल पंपा जवळ संशयित गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या संशयीत गाडीच्या चालकाने गाडी पोलिस कर्मचारी दिलीप गित्ते, अनिल मंडे व शेळके यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान ओळखून पोलिसांनी बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव बचावला नंतर ती सदर संशयित गाडी हि रस्त्याचा बाजूला असलेल्या रेणू पेट्रोलियम नावाच्या लोखंडी पाटीला घासून आडवी झाली. पाठीमागील पोलिसांनी गाडी आडवी लावून थांबविताच त्यातील चारही इसमांनी गाडीतून उड्या मारल्या आणि त्यांनी पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले चौघे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडून त्यांच्या हाता पायाला मार लागून जखमी झाले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना प्रतिकार करून धक्का बुक्की केली. पोलिसांनी त्या गाडीतील अक्षय शामराव आठवले (रा. माळीवेस चौक, सुभाष रोड, बीड), संजेश सुरेशराव पाटेकर (रा. जालना रोड, बीड), वैभव मुकुंदरात कपाळे, (रा. धोंडीपुरा, बीड) आणि वाहन चालक ओंकार अरुणराव पवार (रा. माळवेस, बीड) यांना ताब्यात घेवुन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता अक्षय आठवले याच्या कमरेला दोन पंचासमक्ष सदर इसमांची अंगझडती घेतली असता अक्षय शामराव आठवले याचे अंगझडतीमध्ये त्याचे कमरेला एक सिल्वर रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि त्याच्या मॅग्झीन मध्ये पाच जिवंत काडतुस मिळून आली.
या कट्ट्या बाबत त्याच्याकडे विचापुस केली असता त्याला हा देशी कट्टा त्याचा भाऊ सन्नी शामराव आठवले याने दिलेला असल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलीस नाईक दिलीप गित्ते याच्या तक्रारी वरून अक्षय शामराव आठवले, संजेश सुरेशराव पाटेकर, वैभव मुकुंदरात कपाळे, ओंकार अरुणराव पवार आणि सन्नी शामराव आठवले यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र.. नं. ६३०/२०२३ भा. दं. वि. १८६, ३५३, ३०७, ३४ आणि शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.