Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
कृषी

शेतकर्यांच्या उन्नतीसाठी केज कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर- रमेशरावजी आडसकर

By October 17, 2023No Comments2 Mins Read

शेतकर्यांच्या उन्नतीसाठी केज कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर-
रमेशरावजी आडसकर

केज दि.१७(प्रतिनिधी)-

केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी तंत्रज्ञान व्यस्थापण यंत्रणा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समिती केज येथे मंगळवार १७/१०/२०३३ रोजी शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. नमिता मुंदडा व उदघाटक रमेश आडसकर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ वासुदेव नेहरकर यांनी केले
आ. नमिता ताई मुंदडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जग बदलत आहे त्यानुसार शेतकरी वर्गाने सुद्धा काळानुसार बदल घडविला पाहिजे व शेतीसह सोबत जोड धंदा करणे ही काळाची गरज आहे.
रमेश आडसकर यांनी मार्गदर्शन करताना शेतकर्यांनी पारंपरिक पद्धती बरोबरच आधुनिक पध्दतीने व निसर्गाच्या बदलाचा अभ्यास करून शेती केली पाहिजे. जेणेकरून होणारे नुकसान कमी करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला जावा तसेच केज कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील शेतकर्यांच्या उन्नतीसाठी सदैव तत्परतेने करत आहे. असे सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुश इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतानां सांगितले की , केज तालुक्यातील जे शेतकरी भरगोस उत्पादन काढतीत असे तालुक्यातील ५ शेतकरी दरवर्षी निवडले जातील व त्यांना केज तालुका कृषी रत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात येईल व रोख आकरा हजार रुपये दिले जातील तसेच

या कार्यक्रमात डॉ.व्ही.पी.सूर्यवंशी (कृषी विद्यावेत्ता) रब्बी पीक व्यवस्थापन या विषयावर सविस्तर पणे मार्गदर्शन केले, तर डॉ. सी. डी. बंटेवाड प्राचार्य शासकीय कृषी महाविद्यालय ,अंबाजोगाई हे कीड व रोग नियंत्रण या विषयावर तर . सुनील वराट(जिल्हा रेशीम विकास अधिकारी) हे रेशीम उद्योग व शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, उद्घाटक म्हणून भाजपा जेष्ट नेते रमेश आडसकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक
सुभाष साळवे , प्रशांत वाघमारे , प्रदिप कोठावळे , वासुदेव नेहरकर ,रूषिकेश आडसकर , सुरेश पाटिल , हारूणभाई इनामदार , सिताताई बनसोड , विष्णु घुले , महादेव सुर्यवंशी , दिलीप गुळभिले सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

Post Views: 210

Related Posts

केज कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मा संयुक्तरित्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

October 17, 2023

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या – बाळासाहेब ठोंबरे

December 27, 2022

केज तालुक्यातील साळेगाव येथे आढळला लंपीची लागण झालेली आढळली गाय;परिसरात खळबळ

December 21, 2022
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.