केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू
कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत
गौतम बचुटे/केज :- दसऱ्या निमित्त कपडे धुण्यासाठी गेलेली दोघे सख्खे बहीण भाऊ पाण्यात बुडत असताना त्यांना वाचा वाचयला गेलेल्या आईचा आरडा ओरडा एकूण शेजारी असलेला तरुण त्यांना वाचवायला गेला परंतु दुर्दैवाने दोघे बहीण भाऊ आणि युवक अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दि. १४ ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी केज तालुक्यातील केज शहरातील गणेश नगर भागातील वाघमारे व घोडके हे शेजारी राहात असलेली दोन्ही कुटुंबे ही दुसऱ्या निमित्त कपडे धुण्यासाठी केज-बीड रोडवरील रमाई नगरच्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्या नंतर दुपारी ४:०० च्या सुमारास त्यावेळी वैष्णवी गजानन वाघमारे वय १२ वर्ष आणि सोमेश्वर गजानन वाघमारे १५ वर्ष हे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी त्यांची आई आशा गजानन वाघमारे ही आक्रोश करून त्यांना वाचविण्यासाठी स्वतः पाण्यात उतरली तिचा आरडा ओरडा ऐकून शेजारी असलेला अविनाश संतोष घोडके वय १८ वर्ष याने पाण्यात उडी घेतली त्याने आशा गजानन घोडके हिला वाचविण्यात यश आले मात्र त्याने सोमवश्वर व वैष्णवी यांना वाचावीत असताना खदानीतील पाण्यात बुडवून त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी व सोमेश्वर या दोन सख्ख्या बहीण भावा बरोबरच त्यांना वाचवायला गेलेल्या अविनाश घोडके याचाही मृत्यू झाला. तिथे जमलेल्या काही युवकांनी व प्रशासकीय कर्मचारी यांनी त्या बुडलेल्या युवक व मुलीला बाहेर काढले.
दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या देशा वरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस जमादार श्रीकांत चौधरी, पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे, त्रिंबक सोपने, मतीन शेख, माळी व तलाठी साहिल इनामदार हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी लोकांच्या मदतीने प्रेत पाण्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.
यावेळी या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष सिताताई बनसोड यांनी घटनास्थळी दाखल झाल्या तसेच अनेक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.
——-
आई वाचली पण मुले काळाने हिरावली अन वाचविणारही प्राणाला मुकला ! :- आई मुलांना वाचावीत असताना तीला वाचविण्यात अविनाश घोडके याला यश आले पण दुर्दैवाने वैष्णवी व सोमेश यांचा जीव वाचावीत असताना अविनाश याचाही जीव गेला.
मयत तिघेही सामान्य कुटुंबातील :-
दोन्ही कुटुंबे अत्यंत सामान्य असून वसंत महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या गणेश नगर भागात ते राहात होते