Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
घटना

रस्त्यावर आणि घरात लिंबू हळद कुंकू टाकल्याने गावकऱ्यांत घबराट ! गावकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

By September 13, 2023No Comments2 Mins Read

रस्त्यावर आणि घरात लिंबू हळद कुंकू टाकल्याने गावकऱ्यांत घबराट !

गावकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील लाखा येथे गावात रस्त्यावर आणि गावातील अनेक घरा समोर लिंबू, हळदी कुंकू आणि तांदूळ टाकून जादू टोण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आला आहे यामुळे गावकरी घाबरून गेले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांनी गावात भेट देऊन गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २:३० वा च्या सुमारास बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लाखा ता केज येथे अज्ञात व्यक्तीने गावाच्या प्रवेशद्वारावर आणि मुख्य चौक व नागरिकांच्या घरासमोर आठ ते दहा हळदी-कुंकू टाकून तांदळाचे पट भरून तसेच गोल रिंगण मारून त्यावर लिंबू कापून त्याचे दोन भाग करून जादू टोना केला आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजीज कच्छी, ग्रामसेवक राजाभाऊ वरपे आणि माजी उपसरपंच कुंडलिक सालपे यांनी पोलिस आणि पत्रकार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रा. हनुमंत भोसले आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी गावात जाऊन लोकांनी या प्रकारामुळे घाबरून जाऊ नये व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या नुसार ज्यांनी कोणी असा प्रकार केला असेल त्याचा शोध घेऊन फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यात येईल अशी माहिती गावकऱ्यांना दिली. तसेच गावातून एक फेरी काढून लोकांनी घाबरून जाऊ नये आणि लोकांनी सतर्क राहावे तसेच याचा शोध लागण्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले आहे.

—————————————————————-

जादू टोना व भानामती हे थोतांड ! :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा हनुमंत भोसले यांनी ते जादू टोना केलेले तांदूळ व लिंबू स्वतः खाल्ले आणि लोकांनी भयभीत होऊ नये असे आवाहन त्यानी केले आहे तसेच असे प्रकार घरात ज्यांची घुसमट होते किंवा सततचे आजारपण तसेच भोंदू बाबांच्या नादी लागल्याने जास्त घडतात. त्या बाबत सखोल माहिती घेऊन आणि त्याचे परीक्षण केल्या नंतर याचे सत्य उघड होईल असे त्यांनी सांगितले.

——————————————————–

कायदा हातात घेऊ नये ! :- जरी असे प्रकार करणारे किंवा ज्यांच्या विषयी संशय असेल त्याची माहिती निर्भयपणे पोलिसांना द्यावी माहिती देणाराचे नाव पोलीस गुप्त ठेवतील त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवानही केले आहे.
—————————————————————-

Post Views: 136

Related Posts

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

January 26, 2024

*मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना*

October 28, 2023

केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.