१० वीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण
गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण करण्यात आले असल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १४ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ वा. च्या सुमारास आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून गु र नं २१८/२०२३ भा दं वि ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे हे तपास करीत आहेत.