Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस वीस वर्षाची शिक्षा आणि एक लाखाचा दंड

By October 1, 2023No Comments2 Mins Read

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस वीस
वर्षाची शिक्षा आणि एक लाखाचा दंड

गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी केजच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा व एक लाख रु. च्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, २५ मे २०१७ रोजी केज तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेले होते. अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना आरोपी हा अल्पवयीन मुलीस केजला जाऊ अस म्हणाला. त्यावेळी पिडीत मुलीने नकार देत असताना देखील तिला बळजबरीने कारमध्ये बसवुन उस्मानाबाद जिल्ह्यातील आंदोरा-मस्सा या ठिकाणी नेले. तेथे काही दिवस थांबुन तेथुन पंढरपुर, आळंदी व शेवटी भोसरी येथे नेले. भोसरी येथे भाडयाने खोली करून तेथे पिडीतेची इच्छा नसताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवनु तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्या नंतर नेकनुर येथे आणुन सोडले.
त्या नंतर अशा आशयाच्या पिडितेच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन केज येथे आरोपी विरुध्द गु. र. नं. २६०/२०१७ भा. दं. वि. ३६३, ३७६ (आय), ३४ आणि बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

या फिर्यादी वरून तत्कालीन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासकामी पोलीस कर्मचारी मंगेश भोले व भास्कर सिरसट यांनी त्यांना मदत केली.
पोलिसांनी तपास पूर्ण झाल्या नंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
या प्रकरणाची प्राथमिक सुनावनी अंबाजोगाई न्यायालय येथे होउन अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय केजचे न्यायाधीश कुणाल जाधव यांच्या न्यायालयात झाली.
आरोपी विरूध्द गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सिध्द एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आले.

सदर प्रकरणात मा. न्यायालया समोर झालेला पुरावा व सहाय्यक सरकारी वकील ॲड. राम बी. बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी भिमराव बळीराम धुमक (रा. घाटेवाडी ता. केज जि. बीड) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. कुणाल जाधव यांनी कलम ३६३ भा. द. वी. नुसार दोषी धरून ५ वर्ष कारावासाची शिक्षा व कलम ४ पोक्सो कायद्य प्रामणे २० वर्ष कारावास व १ लाख रूपये पिडीतेस नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न भरल्यास दिड महिन्याचा सश्रम करावासाची शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणात अभियोक्ता सहाय्यक सरकारी वकील ॲड. राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकिल ॲड. आर. पी. उदार, ॲड.सहाय्यक सरकारी वकिल ॲड. एस. व्ही मुंडे आणि पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लांडगे यांनी सहकार्य केले.

Post Views: 44

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.