मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्व संधेला वसंत प्राथमिक शाळेत दिव्यांची मनमोहक रोषनाई
केज-
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुर्व संधेला वसंत प्राथमिक शाळेत आकर्षक रांगोळी काढून दिव्यांची मनमोहक रोषनाई करत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अम्रूत महोत्सव साजरा करण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने शासनाच्या आदेशानुसार हे वर्ष अम्रूत वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, देशमुख प्रशांत, सह शिक्षक किरण अस्वले, प्रविण देशमुख, विजय आरकडे, अंगणवाडी शिक्षिका हजारे मॅडम तसेच गायकवाड मॅडम व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.
