कोतवाल भरती परिक्षेत प्रशांत गवळी याने पटकावला प्रथम क्रमांक
केज-

कोतवाल भरती परीक्षा 2023 केज तालुका आस्थापना विभागाने नुकतीच घेतली होती. ६ जागांसाठी ३५६ उमेदवार परिक्षेला बसले होते. यामध्ये १०० पैकी ९८ गुण प्राप्त करून प्रशांत प्रभाकर गवळी रा. प्रशांत नगर, कानडी रोड केज याने (अनु.जाती प्रभाग) प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवारातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
तहसील कार्यालय केज, आस्थापना विभागाने दि. ८ रोजी ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अनुसूचित जाती मध्ये घाडगे अजय भिमा, ९२ गुण घेऊन द्वितीय, अनुसूचित जमाती कोळी अतुल राजाभाऊ, ८० गुण, वि.जा.अ. पवार गोकुळ तुकाराम, ९४ गुण, इतर मागास वर्ग, सुरवसे सचिन धनंजय, ९६ गुण हे सहा उमेदवार पात्र ठरले आहेत.
