आदर्श प्राथमिक शाळेत दहीहंडी कार्यक्रम उत्साहात
विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने लक्ष वेधले
केज दि ७(प्रतिनिधी)
शहरातील आदर्श प्राथमिक शाळा व आदर्श बालवाडी येथे गोकुळ आष्टमी निमित्त दहिहंडी कार्यक्रम घेण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून दहीहंडी फोडून हसत खेळत आनंद उत्सव साजरा केला.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर सण, उत्सव, परंपरा यांची माहिती झाली पाहिजे याकरिता शाळेत दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खेळीय वातावरणात उत्साहात सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी राधा व कृष्ण वेशभुषा करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.गोविंदा पथकाने मानवी मनोरा उभा करून दहिहंडी फोडण्यात आली. सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला .विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल
शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मोरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अभिनंदन करून प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
भिसे व्ही.बी., आवटे आर.बी., जाधव व्ही.आर., कांगूणे एस. एम., सौ.चौरे के. एम., येवले ए. जे., साखरे डी.एस. आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी फेर धरत दहीहंडी उत्सव साजरा केला.
