Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

बिअरबार फोडीतील दोघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

By August 30, 2023No Comments2 Mins Read

बिअरबार फोडीतील दोघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :- नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्यानी बियर बार फोडून साडेचार लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्या प्रकरणातील दोन आरोपीना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. दोन आठवड्याच्या आत आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १:०० ते ३:०० वा. च्या सुमारास नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैताळवाडी येथील न्यु सरकार सपना बिअरबारमध्ये अज्ञात चोरट्यानी खिडकीतून आत प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईलसह साडेचार लाख रु. चा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी शिवलिंग पांडुरंग मोराळे (रा. निवडुंगवाडी ता.जि.बीड) यांच्या दि. १८ ऑगस्ट रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद वरून गु. र. नं. २४०/२०२३ भा. दं. वि. ४५७, ३८० नुसार अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा शोध घेण्यात संदर्भात मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २९ ऑगस्ट रोजी आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती आधारे होळ येथे एक विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालक व समाधान महादेव घुगे (रा.होळ ता. केज) यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्या वरून पंचा समक्ष त्यांच्या घराची झडती घेण्यात येवून २ लाख ७५ हजार रु चा गुन्हयातील मुद्येमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा, बीड पथकाने आरोपी समाधान महादेव घुगे रा. होळ व विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालक यांना मुद्येमालसह पोलीस ठाणे नेकनूर यांचेकडे स्वाधीन केले आहे.
आरोपीकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास नेकनूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अअधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस जमादार रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, अर्जुन यादव, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे यांनी केली आहे.

Post Views: 45

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.