स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
केजमधील त्या चोरांना केले जेरबंद
केज, दिंद्रुड व परळी ग्रामीण हद्दीतील घरफोडी उघड : दोन आरोपींना केले जेरबंद
गौतम बचुटे/केज :- केज दिंद्रुड आणि परळी येथील घरफोडी प्रकरणी बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले आहे.
या बाबतची माहिती अशी की, ११ जुलै केज येथील शिक्षक कॉलनीत भरदिवसा अज्ञात चोरट्यानी घराच्या गेट वरून उडी
मारून आत प्रवेश करून मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील नगदी अडीच लाख रु.
आणि सत्त्याहत्तर हजार रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केली होती. त्या प्रकरणी दि. १३ जुलै रोजी दिनकर
शिंदे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ४१७/२०२३ भा. दं. वि. ३७९ व ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने अंबाजोगाई शहरातील घरफोडी सारखे गुन्हेगारांची माहिती काढत असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, सत्तार बाबामियाँ सय्यद (रा. लालबहादुर शास्त्री नगर लातुर) याने
केज येथे घरफोडी केलेली असून तो अंबाजोगाई येथे बसस्थानकावर उभा आहे. त्या माहिती वरून पोलीस पथकाने तात्काळ बसस्थानकावर उभा असलेल्या इसमास ताब्यात घेतळे. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार वाजिद उस्मान शेख (रा. मलिकपुरा परळी) या दोघांनी केज येथील दिनकर शिंदे यांचे घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले. वाजिद शेख यालाही पोलीस पथकाने परळीवरून ताब्यात घेतले. दोघांना विश्वासात घेवून घेवून अधिक विचारपुस केली असता त्यांनी केज, दिंद्रुड व परळी येथे घराचे कुलूप तोडून आतील कपाट, पेटया उघडून चोऱ्या केल्याचे सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीआरोपीचे ताब्यातून तीन
गुन्हयातील सोन्याचे विविध दागिन्यांचा मुद्येमाल असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रु. चा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही आरोपींचा पुर्व अभिलेख पाहता त्यांनी पुर्वी घरफोडी व चोरी सारखे गुन्हे केल्याचे अभिलेख असून बंद घराची रेखी करतात. नंतर कटावणीच्या सहाय्याने बंद असलेल्या घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरात ठेवलेले दागिने, रोख रक्कम चोरी करण्याचे सवईचे आहेत. आरोपी सत्तार बाबामियाँ सय्यद हा लातुर जिल्हयातील अभिलेखा वरील हिस्ट्रीशिटर आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दोन्ही आटोपी मुद्देमालासह पुढील तपासासाठी केज पोलीसांच्या स्वाधीन केले आहेत. त्यांच्या कडून आणखीन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, देविदास जमदाडे, पोलीस नाईक राजु पठाण, अर्जुन यादव, विक्की सुरवसे, अतुल हराळे यांनी केली आहे.
