केज शहरात चोरट्यांचा दोन मेडिकलवर डल्ला: एका घटनेत चोरटे सिसी टिव्हीत कैद
केज-
केज मध्ये रात्री दि. 25 रोजी तिनच्या सुमारास दोन तीन मेडिकल दुकाने फोडली आहेत. एका घटनेत चोरटे सिसी टिव्हीत कैद झाले आहेत.
मंगळवार पेठेतील कुलकर्णी यांचे एक दुकान फोडले तर दुसरे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला,तर सुरेश चाटे यांचे ही मेडिकल दुकान फोडले आहे.पहाटे तीन वाजता ही घटना घडली चोरटे ईको गाडीतून आले होते.
या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणा कामाला लावली आहे.
तालुक्यातील माळेगाव परिसरातही चोरीची घटना घडली आहे.
एका रात्रीतून या चोरीच्या घटनेने नागरीकात दहशत निर्माण झाली आहे.
