Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
स्पेशल कवरेज

वाढपी (केटरर्स) ते फौजदार… निलेशचा कष्टप्रद प्रवास ……! मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील शेलगाव गांजीचा निलेश बचुटे झाला पी एस आय

By July 22, 2023No Comments3 Mins Read

वाढपी (केटरर्स) ते फौजदार… निलेशचा कष्टप्रद प्रवास ……!

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील शेलगाव गांजीचा निलेश बचुटे झाला पी एस आय

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील मोलमजुरी करणाऱ्या एका अत्यंत गरीब कुटुंबातील निलेश बचुटे याची पी एस आय म्हणून निवड झाली आहे. निलेशने वाढपी केटरर्स म्हणून देखील काम केलेले आहे. परंतु मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर निलेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फौजदार या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील सौ. शारदा आणि दिलीप बचुटे हे कुटुंब ३० वर्षा पूर्वी गावात उपजीविका भागत नसल्याने व कामधंदा नसल्यामुळे बालाजी नगर, पिंपरी चिंचवड, पुणे येथे स्थलांतरित झाले होते. त्याचे वडील दिलीप व आई सौ. शारदा यांनी बिगारी काम करून मुलांना प्राथमिक दिले. त्यांनी मिळेल ते काम करून बालाजी नगर, पिंपरी चिंचवडच्या झोपडपट्टीत राहून त्यांनी तीन मुलांना शिक्षण दिले. निलेशने त्याचे शिक्षण सुरू असताना औद्योगिक परिसरात वेगवेगळ्या कंपन्यात रोजंदारीवर हेल्पर म्हणून मजुरी केली. त्या नंतर पुन्हा त्याने कार्यक्रमात केटरिंग व जेवण वाढप्याचे काम करून त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ते सर्व काम आणि ढोर मेहनत करीत असताना त्याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निलेश हा वाढपी म्हणून काम करीत असताना तो विविध कार्यक्रम व समारंभात हजर असलेल्या अधिकारी यांच्याकडे कुतूहलाने पहात होता. त्यामुळे त्यालाही वाटायचे की आपणही असा अधिकारी व्हावे. त्या जिद्दीपोटी निलेशने स्पर्धा परीक्षेची तयारी सूरु केली. २०१७ मध्ये थोड्यात त्याची संधी हुकली पण पुनः नव्या उमेदीने आणि जिद्दीने त्याने पुन्हा तयारी करून सन २०२० मध्ये ते यश मिळविले. मागील काही आठवड्या पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निलेशने मिळविल्या यशा बद्दल सर्व गावकरी मित्र मंडळी यांनी त्याचे कौतुक केले आहे.
लवकरच निलेश गावी येणार असून गावात त्याचा सत्कार करण्यात येणार आहे.
————————————————

दहावीत आलेल्या अपयशाने न खचता अभ्यास सुरू ठेवला :- मी काम करून पुन्हा दवावी उत्तीर्ण झालो. त्या नंतर उच्च माध्यमिक, आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्या दरम्यान माझा मोठा भाऊ सिद्धार्थ बचुटे यांनी मी तयारी करून मोठा अधिकारी व्हावे म्हणून मला प्रोत्साहन दिले. तसेच बालाजी नगर येथे आमच्या शेजारी राहत असलेले आणि केज व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी मला वारंवार मार्गदर्शन केले. मोठा भाऊ, आई- वडील आणि मित्र यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर मी हे यश मिळवू शकलो.
—- निलेश दिलीप बचुटे
——————————————————

निलेशचे शिक्षण :-

* इयत्ता ली ते २ री — छत्रपती संभाजी महाराज विद्यालय सदाशिव पेठ पुणे

* इयत्ता ३ री ते ७ वी – पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय नेहरुनगर पिंपरी पुणे शाळा क्र.-१

* इयत्ता ८ वी ते १० वी – भारतीय जैन संघटना विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे

* इयत्ता ११ वी व १२ वी – वाणिज्य शाखा श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा महाविद्यालय चिंचवड स्टेशन पुणे

* पदवीचे शिक्षण – प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आकुर्डी
———————————————-

Post Views: 166

Related Posts

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार राजू वंजारे यांना सा. न्या. मं. सचिव सुमंतजी भांगे यांच्या हस्ते सन्मानित करून प्रधान बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार अभिमानास्पद

March 15, 2024

राजकीय, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेतुत्व :- सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर

October 26, 2023

सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था ची किल्ले रायगड दर्शन मोहीम उत्साहात साजरी

September 1, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.