Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
घटना

केजमध्ये भरदिवसा घराचे कुलूप तोडून जबरी चोरी रोख अडीच लाख रु. आणि ७७ हजाराचे दागिन्यांची चोरी : दोन दिवसानंतर गुन्हा दाखल

By July 14, 2023No Comments2 Mins Read

केजमध्ये भरदिवसा घराचे कुलूप तोडून जबरी चोरी

रोख अडीच लाख रु. आणि ७७ हजाराचे दागिन्यांची चोरी : दोन दिवसानंतर गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- केज येथील शिक्षक कॉलनीत भरदिवसा अज्ञात चोरट्यानी घराच्या गेट वरून उडी मारून आत प्रवेश करून मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील नगदी अडीच लाख रु. आणि सत्त्याहत्तर हजार रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीची घटना घडली आहे.

केज येथील शिक्षक कॉलनीत राहणारे दिनकर शिंदे यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. दि. ११ जुलै रोजी माल घेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे गेले होते. तर त्यांची पत्नी घराला खुप लावून त्यांच्या फर्निचरच्या दुकानात गेली होती. मुलगी सिद्धी व मुलगा अभिषेक हे दोघे शाळेत गेली होते. शाळा सुटल्या नंतर दुपारी ३:३० वा. च्या सुमारास मुलगी सिद्धी ही घरी आली तेव्हा तिला घराच्या मुख्य दरवाजाचा कोंडा व कुलूप तोडून घर उघडे असल्याचे दिसले. तिने ही माहिती शेजाऱ्यांच्या फोनवरून आईला दिली आणि त्या नंतर सौ. जयश्री हिने ही माहिती फोन वरून दिनकर शिंदे त्यांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता अज्ञात चोरट्यांनी दिनकर शिंदे यांच्या घराच्या गेटवरून उडी मारून त्यांच्या मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून दोन बेड रुम मध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले नगदी रोख २ लाख ५० हजार रु. आणि ७७ हजार ५०० रु. किंमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण ३ लाख २७ हजार ५०० रु. चा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी दोन दिवसा नंतर म्हणजे दि. १३ जुलै रोजी दिनकर शिंदे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ४१७/२०२३ भा. दं. वि. ३७९ व ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लांडगे हे करीत आहेत.

Post Views: 115

Related Posts

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

January 26, 2024

*मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना*

October 28, 2023

केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.